आरोग्य आहार : व्हेजीटेबल सुप

आरोग्य आहार 

 व्हेजीटेबल सुप 

साहित्य : १०० ग्राम गाजर , १ वाटी चिरलेली पण कोबी , १ वाटी चिरलेली कांदा पात, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी बारीक चिरलेला घेवडा , एक मोठा चमचा लोणी , एक टेबलस्पून कणिक किंवा मैदा , एक मोठा दालचीनी चा तुकडा , २ लवंगा ,काळीमिरी पूड , चवीनुसार मीठ, एक मोठा कांदा बारीक चिरून . 

कृती : एका पॅनमध्ये लोणी गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतावा , त्यात कणिक किंवा मैदा घालून परतावे व सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून परतावे. ३ कप पाणी घालावे व गॅस बारीक करून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्याव्यात. भाज्या अर्धवट शिजल्यावर दालचिनी , लवंग , काळीमिरी पूड व मीठ घालून सूप उतरवावे . सूप सर्व्ह कारण्याआधी  ते उकळून त्यात एक कप दूध घालून सर्व्ह करावे. 

टीप : 

 * दूध घातले नाही तरी सूप चांगले लागते 

* भाज्या अर्धवट शिजवाव्यात म्हणजे कुरकुरीत राहतात 


Post a Comment

0 Comments