शेतकऱ्यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु

 शेतकऱ्यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु 

नवी दिल्ली : गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु झाले  असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषणकरणार असून  १४ डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "जर सरकार चर्चा करण्यासाठी आणखी एकदा प्रस्ताव पाठवणार असेल, तर आमची कमेटी यावर नक्की विचार करेल. आम्ही सर्वांना आंदोलन करताना शांती राखण्याचं आवाहन करतो."शेतकरी नेते संदीप गिड्डी म्हणाले की, "19 डिसेंबरपासून शेतकऱ्यांचं अनिश्चित काळासाठी केलं जाणारं उपोषण रद्द करण्यात आलं आहे. त्याऐवजी सर्व शेतकरी सोमवारी दिवसभर उपोषणाला बसणार आहेत."

Post a Comment

0 Comments