बाळ बोठेच्या अडचणीत वाढ ...

 बाळ बोठेच्या अडचणीत वाढ ...

जमीन अर्जावर सोमवारी सुनावणी 

वेब टीम नगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयाकडून म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेण्यात आल्याने आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी दि.  १४ रोजी होणार आहे . 

सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी बोठे याने  न्यायालयात हजर राहावे, असा अर्ज पोलिसांकडून देण्यात येत असून, तो सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात दिला जाणार आहे.

सरकारी पक्षाच्या वतीने तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे स्वतः न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे मांडणार आहेत. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल.दरम्यान पुणे विद्यापीठाच्या अभ्यास क्रमात समाविष्ट केलेलं बाळ बोठे याच राजकीय पत्रकारिता हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्यात आहे.संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीच हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान आरोपींच्या झालेल्या ओळख परेड मध्ये मारेकऱ्यांना तीनही प्रत्यक्ष दर्शींनी ओळ्खल्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.या प्रत्यक्षदर्शींमध्ये  रेखा जरे यांचा मुलगा,त्यांची आई आणि महिला बाल विकास कल्याणच्या अधिकारी विजयमाला माने या तिघांनीही आरोपींना ओळ्खल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.    


Post a Comment

0 Comments