७१च्या बांग्लादेशच्या झालेल्या युद्धातील आठवणींना उजाळा

 ले. कर्नल चितळे,ले कर्नल काशी यांच्या सोबत दिल्या ७१च्या बांग्लादेशच्या  झालेल्या  युद्धातील आठवणींना उजाळा  

भारतीय लष्कराचे  लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण आनंदराव चितळे  डोगरा रेजिमेंट,आणि  गोरखा फलटणीचे लेफ्टनंट कर्नल ॲड.  काशीद  या दोघांनी भारतीय लष्कराने लढलेल्या भारत पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग नोंदविला आहे . आज लेफ्टनंट कर्नल चितळे वय ८६ असूनही तरुणाला लाजवतील अशा भूमिकेत ते पुण्यातील घरी नगर मधील सैनिक विश्रामगृहात आणि नेवासे तालुक्यातील शेतीत उत्साहाने कार्यरत आहेत.

  नगरचे  जेष्ठ पत्रकार भंडारे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणतात ६२ साली  नागालँड मधून बंडखोर नागा सैनिकांशी लढलो तर ६७ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याशी दोन हात केले .  ७१ साली  पूर्व पाकिस्तानच्या अधिकारी व सैनिक यांच्यात हातघाईची लढाई केली . 

जनरल माणेक शॉ  यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्व पाकिस्तानातील बंगाली सैन्याशी लढून आणि पश्चिम पाकिस्तानातील मुजोर पाकिस्तानी सैन्याचा तोरा उतरवायचा  असेल तर जनरल  माणेक शॉ यांनी एक वर्षाची मुदत मागून घेतली आणि भारतीय हददी  पासून पूर्व पाकिस्तान म्हणजे हल्लीचा बांगलादेश यांची भारतीय सैन्याला रेकी  करायला लावली.  आताच्या बांगला देशातील नद्या,ओढे ,  रेल्वे स्टेशन, बसस्टेशन, रंगून, ढाका,चितगाव येथील विमानतळ आणि लष्करी तळ यांची माहिती मिळवली पूर्व पाकिस्तानातील सैनिकांना भारतीय सैनिकांच्या मदतीने मुक्ती वाहिन्यांच्या माध्यमातून वर्षभर मदत केली पूर्व पाकिस्तानातील बंडखोर पाकिस्तानी सैनिक, स्वातंत्र्ययोद्धा यांना मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून मदत केली आणि या लोकांचं माहिती व संदेश दळणवळण व्यवस्थित राहावे यासाठी आंतरराष्ट्रीय समुद्रात जहाजावर आकाशवाणी व बिनतारी  यंत्रणेची उत्कृष्ट व्यवस्था केली .या ढाक्का  बेतार संदेश दळण -वळण  यंत्रणे मुळे भारताच्या मदतीने स्वतंत्र दळणवळण व्यवस्था ही उभी केली.  त्यामुळे पाकिस्तान मधून येणारे सर्व प्रकारची रसद  तुटल्याने पूर्व पाकिस्तानातील सैन्यावर भारतीय सैन्याने गनिमी हल्ले केले त्यामुळे विमानतळ ,बंदर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक ,यांचे विशेष नुकसान न होता तोफांनी केलेल्या हल्ल्यामुळे वरील सर्व ठिकाणांची पाकिस्तानी सेना निष्प्रभ झाली अवघ्या आठ दिवसात पाकिस्तानी सैन्य नामोहरम झाले त्यामुळे बांगलादेश या नव्या देशाचा उदय भारतीय सैन्याने केला, आणि बांगलादेश या नव्या देशाला नुकसान न होता सर्व दळणवळणाची साधनं आयतीच बांगलादेशला   देण्यात आली . ढाक्काच्या रेसकोर्सवर जनरल नियाजी यांच्या सह९३ हजार सैन्य युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले.  त्यातील अनेक अधिकारी विसापूर जेल मध्ये होते.  आणि त्यातील एक कोटी निर्वासितांना भारताने वर्षभर पोसले जगाच्या पाठीवर असा कोठेही इतिहास नाही . त्यामुळे भारतातील अनेक घटक राज्यांनी निर्वासित सहाय्यता कर भारतीय नागरिकांवर बसले ६२  च्या युद्धात भारतीय सेनेने नागा बंडखोरांना सरळ केले . त्यानंतर नागा आदिवासी बंडखोरांचा नेता भारताबाहेर पळून गेला तर त्याच्या बहिणीने मेजर आनंद यांच्या बरोबर  लग्न केलं.

 भारतीय सैन्याने एका हातात बंदुका आणि एका हातात कुर्हाडी सांभाळत शंभर- शंभर फूट उंचीची झाडे तोडून खुशकी  चे रस्ते बनवले दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी जपानी सैन्य बर्मा रंगून मधून म्हणजेच आताचे म्यानमार  येथून नागालँड पर्यंत धडक मारली युद्धात खुष्कीच्या मार्गाने येणे-जाणे केले असे लेफ्टनंट कर्नल चितळे म्हणाले गोरखा फलटण ॲड. किसनराव आनंदराव काशीद राहणार सारोळा तालुका जामखेड हे  जिल्हा बँकेचे माजी माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे कार्यकर्ते  साहेबराव पाटील यांचे जावई या दोघां वयोवृद्ध लष्करी अधिकाऱ्यांची नगरचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांनी फ्लॅग डे  म्हणजे झेंडा दिनाच्या निमित्ताने घेतलेली ही मुलाखत यावेळी त्यांचे साहाय्यक कॅमेरामन   म्हणून वायुदलाचे निवृत्त सार्जंट पियुष  गायकवाड ते देखील होते. 

Post a Comment

0 Comments