नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानवजात एक समान आहे हा संदेश दिला 

प्रा.शशिकांत गाडे : शिवसेनेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

   वेब टीम  नगर :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जगभर ख्याती मिळविली. त्यांनी सर्व मानवजात एक समान आहे, हा संदेश दिला. शिवसेना पक्षही तळागळातील लोकांचे प्रश्‍न सोडवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श विचारावर कार्य करत आहे. समाजातील भेदभाव नष्ट करुन सर्वसामाजाला त्यांचे हक्क मिळवून देणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.

     शिवसेनेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, योगिराज गाडे, मदन आढाव, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, संग्राम शेळके, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, दत्ता जाधव, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, दिपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, काका शेळके आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

     यावेळी संभाजी कदम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुता संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. देशाला धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाद्वारे सर्व भारतीयांस प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे जगात भारताची एक आदर्शवत जीवनशैली निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्यांचे विचार कृतीतून आणणे हाच खरा त्यांच्या कार्याचा गौरव ठरले.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, संविधानाच्या रुपाने  समाजातील सर्व जाती-धर्मांना एकत्र करुन देशाला एकसंघ बांधण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. देशाची अखंडतेचे ते प्रणेते होते. शिक्षणाशिवाय मनुष्याची प्रगती नाही, हे जाणून त्यांनी समाजाला शिक्षित करुन आत्मसन्मान मिळवून दिला. अशी महान व्यक्ती सर्वांचे प्रेरणास्थानच आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गरजूंसाठी दानशूरांनी पुढे यावे :अनुराधा फुंदे 

फुंदे दाम्पत्याकडून उषाताईस मिळाला रोजगाराचा आधार

    वेब टीम नगर : कोरोनामुळे स्थलांतरीत होवून बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या पाथर्डी शहरातील उषाताई रंगाटे या भगिनीस हातगाडी उपलब्ध करुन काही दिवस पुरेल एवढे वडा-पावसाठी लागणार साहित्य भेट देवून ‘श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर’ हा व्यवसाय सुरु करुन दिला. आपली छोटीशी मदत गरजूंना हिंमत देते त्यांना जगायला बळ निर्माण करते म्हणून गरजूंच्या मदतीसाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन गुरुकुल आघाडीच्या तथा सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे यांनी केले.

     गेले काही वर्षे समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी आपल्या पगारातील काही हिस्सा खर्च करत वेगवेगळ्या स्तरावर सातत्याने काम करणारे शिक्षक दांम्पत्य अनुराधा व पोपटराव फुंदे यांनी वंचित गरजूंसाठी व्यापक काम करण्यासाठी सेवाश्रय फाऊंडेशनची स्थापना करुन आधार देण्याच काम करत आहेत. त्याद्वारे वडापाव सेंटरचे उदघाटन करुन देत पहिला वडा विकत घेवून गरजूंच फुकट खाऊ नये हा अनोखा आदर्श निर्माण केला.  वंचितांची सेवा म्हणून त्यांना आश्रय देण ही सामाजिक बांधिलकी जपत उषाताई सारख्या होतकरु भगिनीस स्वाभिमानाने जगायला मोठे बळ अन आधार देण्याचे काम फुंदे दांम्पत्याने केले.

     हे विश्‍वची माझे घर या उक्तीप्रमाणे आपला कोणी बांधव उपाशी राहू नये की एखादा चिमुकला शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी भविष्यात मोठ्या स्वरुपाच काम सेवाश्रयच्या माध्यमातून करणार असल्याचे अनुराधा फुंदे यांनी सांगितले.ं

     सेवाश्रयच्या या अनोख्या उपक्रमाच सभापती सुनिताताई दौंड, उपसभापती मनिषाताई वायकर, शिक्षकनेते संजय कळमकर, रा.या.औटी, वृषाली कडलग आदिनी कौतुक केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणसाप्रमाणे

जगण्याचा हक्क देणारे  क्रांतीकारी होते : सुहास धीवर

   वेब टीम  नगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी म्हटले.  प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करुन आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली. डॉ.बाबासाहेब हे माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क देणारा जगातील पहिले क्रांतीकारी, गुलामाला गुलामीची जाणिव करुन देणारे अद्भुत सेनानी होते. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मुलमंत्र देणारा महामेरु म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन पंडित नेहरु हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी केले.

     किल्ला मैदान येथील पंडित नेहरु हिंदी विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुहास धीवर, बाबासाहेब बोडखे, सुदेश छजलाने, विनित थोरात, वैभव शिंदे, ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड, किशोर नरवडे, सविता केदारे, मनोज महंकाळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बाबासाहेब बोडखे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील विविध घटना सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश छजलाने यांनी केले तर आभार विनित थोरात यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्व भारत वासीयांनी राज्य घटनेचा आदर करून देशहिताचे कार्य करावे 

ब्रिजलाल सारडा : पेमराज सारडा महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वेब टीम नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना देवून महान कार्य केले आहे. देश जोडण्यासाठी या घटनेचा वापर व्हावा अशी अपेक्षा त्यावेळी यांनी व्यक्त केली होती. मात्र सध्या काही अपप्रवृत्ती या घटनेचा गैरफायदा घेत घटनेच्या विरोधात काम करत आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वात्यंत्र्याला बाधा पोहचत आहे. सर्व भारत वासीयांनी या राज्य घटनेचा आदर करून देशहिताचे कार्य करावेत, असे आवाहन हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेमराज सारडा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, सचिव संजय जोशी, माजी सचिव सुनील रामदासी, उपाध्यक्ष महेंद्र गंधे, प्रा. मकरंद खेर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, आदी उपस्थित होते.

          प्रा. शिरीष मोडक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्य व विचार आत्मसात करत काम करू असे सांगितले. संजय जोशी यांनी सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आदर्श घेवून जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले. सुनील रामदासी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष आणत देशला विकासाकडे नेले असल्याचे सांगितले.  अजित बोरा यांनी आभार मानतांना केवळ आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचे स्वरण ण करता कायम त्यांच्या आदर्श विचाराचे स्मरण  करत काम करावे असे सांगितले.      यावेळी मंडळाचे सहाय्यक सचिव बी. यु. कुलकर्णी, प्रबंधक अशोक असेरी, गोवर्धन पांडूळे, कैलास बालटे आदी उपस्थित होते . 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा मार्केटयार्ड चौकातच उभारण्याची मागणी

बहुजन समाज पार्टि च्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन 

वेब टीम नगर: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष जितेंद्र साठे, बाळासाहेब मधे, बौध्दाचार्य दिपक पाटोळे, संतोष जाधव, प्रतिक जाधव, अजिनाथ आलचेट्टी, अतुल काते, विजू गायकवाड, सागर पोळ, रामभाऊ ठुबे, बाळासाहेब गायकवाड, सचिन खुडे, रमेश बागल, सुधीर सुर्यवंशी, दामोदर साळवे आदि उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळ्याने शहराची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. अनेकवर्षापासून मार्केटयार्ड चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याने त्यांच्या अनुयायीमध्ये एक वेगळी भावना जोडली गेली आहे. शहरात इतर ठिकाणी पुतळा उभारत असताना मार्केटयार्ड चौकातील पुतळा न हटविता त्या ठिकाणी देखील पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा प्रभारी संजय डहाणे व जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात 

संजय सपकाळ : राष्ट्रवादीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना भिंगारमध्ये अभिवादन

वेब टीम नगर : देशात समता व स्वातंत्र्यता डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने प्रस्थापित आहे. भांडवलदारांचे हित जोपासणारी भाजप सरकार घटनेच्या विरोधात कारभार करुन हुकुमशाही प्रस्थापित करीत आहे. दीन, दलितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. या ज्ञानी व महामानवाची दखल संपुर्ण जगाने घेतली असून, त्यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादीत नसून, युवकांनी त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याची भावना राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथील त्यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सपकाळ बोलत होते. प्रारंभी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन भीम वंदना सादर करण्यात आली. याप्रसंगी युवकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, जेव्हिअर भिंगारदिवे, अजय दिघे, सुरेश मेहतानी, रमेश वराडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, शिवम भंडारी, संपत बेरड, अजिंक्य भिंगारदिवे, मच्छिंद्र बेरड, अशोक भोसले, हंगारके सर, मंगेश मोकळ, अर्जुन बेरड, विशाल आण्णा बेलपवार, अक्षय भिंगारदिवे, गणेश बोरुडे, दिपक बडदे सदाशिव मांढरे, सिध्दार्थ आढाव, अशोक भिंगारदिवे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बाबासाहेबांच्या  पुर्णाकृती पुतळ्यासह अद्यावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याची मागणी

वेब टीम नगर :  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते, लक्ष्मण गायकवाड, अरुण चांदणे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात तातडीने डॉ. बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारुन त्याभोवती उद्यान विकसीत करावे, त्यांच्या नावाने शहरात अद्यावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे व दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली. समता, स्वातंत्र्यता, व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना डॉ.बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने देशात आली. त्यांचे विचार सर्व समाजाला दीपस्तंभाप्रमाणे असल्याची भावना  जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी व्यक्त केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 बाबासाहेबांच्या  पुर्णाकृती पुतळ्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार:आ. संग्राम जगताप

वेब टीम नगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक विचार व दिशा दिली. हे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी दिलेली समता व मानवतेचे शिकवण समाजाचा उध्दार करणारी आहे. त्यांच्या कार्याची व विचाराची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाकडून योग्य जागा मिळवून, या पुतळ्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याची भावना आ.  संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, चर्मकार विकास संघाचे सुरेश खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक अजय दिघे, उपाध्यक्ष निलेश इंगळे, महादेव कराळे, एकनाथ भिंगारदिवे, मळू गाडळकर, संध्या मेढे, गणेश बोरुडे, अक्षय भिंगारदिवे, मनिष साठे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा.माणिक विधाते यांनी दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना खर्‍या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. वंचितांसाठी कार्य करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवल्यास हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याने दीन-दलितांना जगण्याचा अधिकार मिळाला -अमित काळे

वेब टीम नगर : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, नगरसेवक राहुल कांबळे, नाना पाटोळे, अ‍ॅड. संतोष गायकवाड, विनोद भिंगारदिवे, दिपक गायकवाड, मंगेश मोकळ, युवराज पाखरे, विशाल कटारनवरे, महादेव भिंगारदिवे, आकाश अरुण, प्रविण वाघमारे, विलास साळवे, दया गजभिये, लखन आढाव, संतोष सारसर, विशाल बेलपवार, अमोल पाटोळे, गौतम कांबळे, संदीप आहेर, विवेक भिंगारदीवे, अक्षय भिंगारदिवे, सचिन छजलानी आदिंसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक शहराध्यक्ष अमित काळे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याने दीन-दलितांना जगण्याचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांनीच लोकशाहीची मुल्ये देशात घटनेच्या रुपात रुजवली. त्यांच्या कार्यानेच विविधतेने नटलेला देश एकसंघपणे उभा असून, त्यांचे कार्य व विचार आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विजयाच्या व जय भिमच्या जोरदार घोषणा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेबांचे विचार समोर ठेऊन अवयवदान चळवळीत योगदान देण्याची गरज

जालिंदर बोरुडे : ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी ६४ नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प फिनिक्स फाऊंडेशनचा पुढाकार

वेब टीम नगर :  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने ६४ नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. फाऊंडेशनच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच देशात अनेक नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असताना त्यांना नवीन जीवदान देण्यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन करुन, अवयवदानाचे अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अतुल थोरात, प्रदिप भिंगारदिवे, सुनिल थोरात, राजू गायकवाड, अक्षय म्हस्के, अनिल जाधव, संजय भिंगारदिवे, अजय आठवले, अरविंद साळवे, सुनिल सकट आदि उपस्थित होते.

 जालिंदर बोरुडे म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी केल्यास खर्‍या अर्थाने त्यांना आदरांजली ठरणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण आयुष्य दीन-दलितांच्या उध्दारासाठी खर्च केले.  त्यांची शिकवण आजही सर्व समाजबांधवांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचार समोर ठेऊन अवयवदान चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. देशात मोठ्या संख्येने नागरिक अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. शरीर हे नष्वर असून मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवाने इतरांना जीवदान मिळत असेल तर यासारखे पुण्य कमविण्याचे भाग्य दुसरे नाही. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून ७ व्यक्तींना जीवदान मिळू शकतो. अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, विविध माध्यमांद्वारे समाजात जागृती करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संयुक्त शेतकरी आघाड्यांच्या भारत बंदला नगर शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

किरण काळे : मोदी सरकारचे काळे कायदे शेतकरीच नव्हे ,तर शहरी नागरिकांच्या देखील विरोधात असल्याची टीका

वेब टीम नगर : मंगळवार  दि.  ८ डिसेंबर रोजी देशभरातील विविध संयुक्त शेतकरी आघाड्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. 

याबाबत काळे म्हणाले की, देशामध्ये अभूतपूर्व असे शेतकरी आंदोलन इतिहासात पहिल्यांदाच चालू आहे. दिल्लीच्या सीमेवरती लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या न्याय मागणीसाठी जीवाची पर्वा न करता तळ ठोकून आहेत. परंतु जाणीवपूर्वक कानावर हात ठेवलेल्या  देशातल्या जुलमी भाजप प्रणित केंद्र सरकारला अजूनही त्यांची हाक ऐकू येत नाही. 

हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे एकट्याचे नसून या देशातील शहरी भागातील प्रत्येक नागरिकाचे देखील आहे. कारण सबंध मानवजात ही शेतकऱ्याच्या घामातून पीकणाऱ्या अन्नधान्यवर अवलंबून आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या भाजपच्या काळ्या कायद्यांना त्यामुळे शहरातील नागरिकांचा देखील तेवढाच तीव्र विरोध आहे, हे मोदी सरकारने लक्षात घ्यावे असा इशारा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

शहर जिल्हा काँग्रेसने या काळ्या कायद्यांच्या विरोधात नगर शहरात विविध निदर्शने, आंदोलने, सत्याग्रह त्याचबरोबर हजारो सह्यांची मोहीम राबवली आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसने संगमनेर येथून आयोजित केलेल्या राज्यव्यापी किसान वर्च्युअल रॅलीमध्ये देखील शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व फ्रंटल ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.

काळे म्हणाले कि, महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून सबंध राज्यातच काँग्रेसने बंदला पाठिंबा दिला आहे. प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस देखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून या आंदोलनाला आम्ही देखील पाठिंबा देत आहोत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments