तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

 तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर 
परिचय मेळाव्याचे रविवारी  आयोजन


वेब टीम नगर : तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.  महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचार मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती  वधुवर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष सोमनाथ देवकर यांनी दिली आहे.  नगरमधील सावेडीतील झोपडी कँटीन परिसरातील माउली संकुल सभागृहात हा कार्यक्रम होईल . 

      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  उदयोजक सतीशशेठ गवळी हे स्वीकारणार आहेत .  तर प्रमुख पाहुणे म्हणून   पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे , उद्योजक जगन्नाथ गाडे , व्यापारी राहुल म्हस्के , उद्योजक विनोद राऊत , राहुरी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ , उद्योजक बबलूशेठ पतके , पुणे येथील उद्योजक संतोष माकोडे , व्यापारी दिलीप दारुणकर, कैलास शेलार ,  हे उपस्थित राहणार आहेत .  मेट्रो न्यूज च्या फेसबुक व यु ट्यूब पेजवरून या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे . 

सकाळी  ११. वाजता या मेळाव्याचे दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात येणार आहे.   यानिमित्ताने समाजातील राज्यातील विविध भागातील उपवर बधुंची माहिती फोटो व त्यांचे पत्ता व  संपर्क क्रमांक असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे .   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पुस्तक प्रकाशन होईल . पुस्तिकेत ज्यांचे नाव असेल अशाना पुस्तिका मोफत देण्यात येईल , स्नेहभोजनाची व्यवस्था आहे . तरी तेली समाज बांधवानी  मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन संताजी विचार मंचच्यावतीने करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अरविंद दारुणकर , दिनकरराव घोडके, विजय काळे, बाळकृष्ण दारुणकर , नितीन फल्ले , प्रीतम मानुरकर , गणेश धारक , अभिषेक भागवत , किसनराव क्षीरसागर , काळे गुरुजी आदी प्रयत्नशील आहेत .  


Post a Comment

0 Comments