बाळ बोठेचे पिस्तूल जप्त

 बाळ बोठेचे पिस्तूल जप्त 

वेब टीम नगर : रेखा जरे  हत्या कांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोटे ह्याच्या घराची पुन्हा झाडाझडती घेत पोलिसांनी त्याचे परवाना असलेले पिस्तूल ताब्यात घेतले .बोठे  याने परदेश गमन करू नये यासाठी त्याच्या विरोधात लूकआउट नोटिस जारी केली आहे . 

जरे हत्याकांड प्रकरणात आपले नाव समोर येणार याची कुणकुण लागताच २ दिवसांपूर्वीच बाळ बोठे पसार झाला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सुपे पोलीस ठाणे , उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग यांची शोध पथके बोठेचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहते बाळ बोठे याने त्याच्या  कडील  मोबाईल व वाहने घरीच ठेवल्याने तो अन्य साथीदाराच्या मदतीने पसार झाल्याचे समजते. शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या पथकाने त्याच्या घराची झाडाझडती घेतली. पत्रकार म्हणून काम करत असल्याने बोठे याच्यावर अनेकदा हल्ले झाले होते. त्या आधारे त्याने पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या मोबाईल सह अन्य काही कागदपत्र ताब्यात घेतली असून त्याच्या बाबत महत्वाचे धागेदोरे हाती आल्याने तो लवकरच जेरबंद होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments