हेंद्राबाद महापालिकेत टी.आर.एस चेच वर्चस्व
वेब टीम हेंद्राबाद : हैदराबाद महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु असून निकालाचे कल स्पष्ट होत असून त्यात टी.आर.एस ला सराधिक म्हणजे ७० तर ए.आय.एम.आय.एम ला ४२ , भाजप ३६, आणि काँग्रेसला २ असा असून हेंद्राबाद महापालिकेत टी.आर.एस पक्षाला स्पष्ट बहुमताला फक्त ६ जागा कमी पडल्या आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये मागे असलेल्या टीआरएसने जोरदार मुसंडी घेतली आहे. कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. परंतु हळूहळू टीआरएसचं वर्चस्व वाढलं आणि भाजप थेट तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. तर निकालांमध्ये ओवेसेंचा पक्ष एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
150 जागांच्या हैदराबाद महापालिकेसाठी 1 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडलं होतं. त्यामुळे संपूर्ण निकालाचं चित्र संध्याकाळी किंवा रात्री स्पष्ट होईल. जीएचएमसी निवडणुकी 1122 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती . 30 ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती . प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मागील निवडणुकीत टीआरएसने महापालिकेवर ताबा मिळवला होता तो यंदाही कायम ठेवण्यात त्यांना यश मिळतं का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
0 Comments