प्रेयसीने कापले नवरीचे केस .....

 प्रेयसीने कापले नवरीचे केस ..... 

वेब टीम नालंदा : बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. नातेवाईकानी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

 भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने घरात झोपलेल्या नव्या नवरीचे केस कापले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्याचदरम्यान, पीडितीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी आरोपी तरुणीला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिसांच्या हवाली केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितले की, रात्री नवरी खोलीत झोपली होती. मध्यरात्रीची वेळ साधून संबंधित तरूणी तिच्या खोलीत शिरली. ती मुलगी आणि नवरी मुलगी यांच्यात झटापट झाल्याने आरडाओरड ऐकून आम्ही तिथे गेलो. नवविवाहितेची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. त्याचवेळी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पकडून नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत ती तरूणी जखमी झाली होती.


Post a Comment

0 Comments