जरे हत्या प्रकरणात पोलिसांचे मौन

 जरे हत्या प्रकरणात पोलिसांचे मौन 

वेब टीम नगर : रेखा जरे हत्या कांड प्रकरणातील एका सूत्रधाराला जेरबंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. दरम्यान रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघा आरोपींसह तिघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.पोलिसांनी  आरोपींच्या नावा बाबत गुप्तता पाळली असून आणखीन एक सूत्रधार पोलिसांच्या हाती लागणे बाकी असल्याचे कळते. 

रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊनच झाल्याचे निष्पन्न  झाल्यानंतर या कटातील मुख्य सूत्रधार राहुरीतील असून त्याचा एक साथीदार कोकणात फरार झाला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. मात्र एकूणच या प्रकरणात पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसते. एरवी एखाद्या भुरट्या चोराला पकडल्यानंतर प्रेस नोट काढणाऱ्या आणि पत्रकार परिषदा घेणारे पोलीस प्रशासन या प्रकरणात एवढी गुप्तता का पाळत आहेत. या बद्दल माध्यमातून उलट सुलट चर्चा सुरु आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक सुप्यातील पत्रकारांशी या विषयावर बोलणार असल्याचे समजते.  

Post a Comment

0 Comments