जरे हत्या प्रकरणी ३ जण अटकेत

जरे हत्या प्रकरणी ३ जण अटकेत 

पोलीस मास्टरमाइंडच्या शोधात 

वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी दोघांना कोल्हार येथून तिघांना ताब्यात घेतलेअसून त्यातील एक जण केडगाव मधील आहे. सुपारी घेऊन हत्या केल्याची माहिती त्यांच्याकाडुन प्राथमिक चौकशीत पुढे अली असून पोलीस आता या हत्ये मागील मास्टरमाइंड च्या शोधात आहेत. 

रेखा जरे  पाटील, त्यांच्या आई , मुलगा , महिला बाल  विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने हे चौघे कारने सोमवारी पुण्याहून नगरकडे येत होते शिरूर नजीक दुचाकी स्वाराने जरे यांच्या कारला हूल दिली त्यानंतर कारला ओव्हरटेक करून दुचाकी आडवी घालून कार थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर जरे यांच्या बरोबर वादावादी झाली या दरम्यान त्यातील एकाने रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. तर जरे  यांना घेऊन त्यांच्या बरोबरचे सिव्हिल हॉस्पिटलला आले मात्र प्रवासा दरम्यान रेखा जरे यांचा मृत्यू झाला होता.  


याबाबत सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे स्थानिक गुन्हा शाखेने  ५ पथकांची नियुक्ती कालच केली होती. कोल्हार येथून काल तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यातील एक जण केडगाव चा असल्याचे समजते. प्राथमिक चौकशीत जरे यांची हत्या सुपारी घेऊनच झाल्याचे निष्पन्न झालें आता पोलीस मास्टरमाइंड च्या शोधात आहेत. 

Post a Comment

0 Comments