आरोग्य आहार

 आरोग्य आहार

 

 चपाती नूडल्स 

साहित्य : ४ते ५ छोट्या पोळ्या ,गाजर,पत्ताकोबी ,सिमला मिरची ,लसूण ,हिरवी मिरची,पातीचा कांदा ,टोमॅटो केचप ,सोया सॉस ,मिरपूड, मीठ 

कृती : प्रथम पोळीचा  घट्ट रोलं करून घेणे.नंतर सुरीने बारीक काप करून नूडल्स करून घेणे .लांब काप होतात . गाजर बारीक चिरून घेणे,पत्ताकोबीही बारीक चिरावा. लासनाचेही बारीक तुकडे करणे सिमला मिरची आणि पातीचा कांदा बारीक चिरून घ्यावा . कढईत तेल तापल्यानंतर हिरवी मिरची, लसूण ,गाजर ,पत्ताकोबी,सिमला मिरची टाकून परतणे . त्यामध्ये सोया सॉस ,केचप, मीठ ,मिरपूड घालून परतावे. मग यामध्ये पोळीच्या तयार केलेल्या नूडल्स टॉस कराव्यात. 

तयार नूडल्सवर बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व्ह करणे . 

सर्व भाज्या व पोळीच्या केलेल्या नूडल्स मुळे ही डिश फार पौष्टिक होते. 

Post a Comment

0 Comments