ईडी ची शोध मोहीम

 ईडी ची शोध मोहीम  वेब टीम मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी  ईडी धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.तर हि फक्त शोध मोहीम असल्याचं ईडी कडून सांगण्यात येत आहे. 

दिल्लीतील मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या एका कंपनीशी सरनाईकांचे लागेबांधे असल्याची माहिती ईडी ला मिळाली त्यानुसार दिल्लीच्या ईडी च्या पथकाने मुंबईतील पथकासह सरनाईक यांच्या कार्यालयात घरी काही कागदपत्र मिळतात का यासाठी शोध मोहीम  केल्याची माहिती ईडी च्या पथकानी दिली.या मोहिमेला छापा न म्हणता शोध मोहीम म्हणावे अशी विनंती या पथकाने केली आहे.     

 प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक सकाळी ८ वाजता दाखल झालं. एकूण १० ठिकाणी हि मोहीम सुरु करण्यात  आली .  दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.


Post a Comment

0 Comments