आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

मिक्स डाळ ढोकळा 


साहित्य : ५ छोटी वाटी तांदूळ , ३ छोटी वाटी हरभरा डाळ , २ छोटी वाटी उडीद डाळ, १ वाटी मूग डाळ , पाव चमचा मेथी दाणे, आले मिरची पेस्ट ३ चमचे आंबट दही , मीठ , साखर, चिमूटभर सोडा , तीळ. 

कृती : प्रथम सर्व डाळी वेगवेगळ्या ६ ते ७ तासांसाठी भिजत घालाव्यात. त्यापैकी कोणत्याही एका डाळीत मेथी दाणे घालावेत. त्यानंतर मिक्सर मधून रवाळ वाटून घेणे व एकत्र करून घेणे. त्यामध्ये ३ चमचे आंबट दही घालून १५ मिनिटे झाकून ठेवावे.

ढोकळा करतांना त्यात आले-मिरची पेस्ट, जिरे, मीठ , साखर, १ चमचा तेल, घालून चांगले मिक्स करून घेणे. एकीकडे कुकरमधे पाणी उकळत ठेवणे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्या भांड्याला तेल लावून घेणे. तयार पिठामध्ये चिमूटभर सोडा टाकून एकत्रित करून घेणे व लगेचच तेल लावलेल्या भांड्यात घालून २० मिनिटांसाठी कुकर मध्ये शिट्टी न लावता  वाफवून घेणे. 

तयार ढोकळ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरणे. नंतर मोहरी व तिळाची फोडणी टाकणे. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करणे.   

टीप : नुसत्या डाळीच्या पिठाच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा जास्त प्रोटीन युक्त आहे. ढोकळ्याच्या वरील प्रमाणानुसार डाळी व तांदूळ गिरणीतंतून रवाळ दळून आणून ढोकळा केला तरी चालतो. फक्त कोरडे पीठ ७ ते ८ तास ताकामध्ये भिजवावे . 

रंग हवा असल्यास पिवळा रंग घातला तरी चालतो. 

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak   


Post a Comment

0 Comments