पथनाट्यातून मनपाचे प्रबोधन

 पथनाट्यातून मनपाचे प्रबोधन 

वेब टीम नगर : वर्दळीचा चौक कोणी भाजी घेण्यात गुंग तर कोणी कशात इतक्यात ४-५ मोटर सायकली येतात त्यावरून एक सारखा पोशाख घातलेले काही तरुण मुलं - मुली उतरतात त्यांच्यापैकीच एकाच्या मोटर सायकला स्वच्छतेचे महत्व सांगणारा  फलक लावलेला असतो. त्यांच्यातला म्होरक्या हातातल्या डफलीवर थाप देऊन गर्दीच लक्ष वेधून घेतो आणि अंगयला सुरवात करतो, " ऐका हो ऐका " गर्दीचे लक्ष त्या युवकाकडे जाते. तसं त्या चमूतील तरुण-तरुणी त्याच्या भोवती फेर धरतात आणि गाऊ लागतात आणि लक्षात येत मनपाची स्वच्छता मोहीम सुरु असल्यानं त्याच्या प्रसाराचं पथनाट्याच सादरी करण ते करत आहेत. 


स्वच्छता मोहिमेत अहमदनगर महानगर पालिकेनं गेल्या वेळेस ४०वा क्रमांक पटकावला आणि आता पुन्हा ही मोहीम सुरु होत आहे. त्याच्या प्रचारासाठी महानगर पालिकेनं शहरातीलच " आपलं घर " या नाट्य संघाला ३० दिवसांसाठी करार बद्ध केलं आहे. या नाट्य संघानं रोज वर्दळ असलेल्या ३ चौकात पथनाट्याच सादरीकरण करायचं आणि त्या माध्यमातून जनजागृती , प्रबोधन करायचं. म्हणजे एकूण ९० पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची नामी शक्कल मनपाने शोधली आहे. 

नाटक , पथनाट्य हा प्रबोधनाचा उत्तम मार्ग असल्यानं त्या द्वारे अत्यंत प्रभावी पणे जनजागृती करता येते. एका राज्याच्या राज कन्येचं स्वयंवर मांडलं जातं स्वयंवराच्या निमित्ताने अनेक राज्यांचे राजपुत्र स्वयंवराला येतात. तेव्हा ती राज कन्या स्वयंवराचा " पण " सांगते ज्या राज्यात स्वच्छता असेल, जे राज्य हरित असेल , आणि ज्या राज्यात पाण्याचा पारेषण निर्माण होणार नाही अश्याच राज्याच्या राजपुत्राशी ती लग्न करणार आहे. आणि मग ओघानं स्वच्छ शहराचा विषय आल्यानंतर कचर्याचे वर्गीकरण कसे करावे त्याबाबद्दलची माहिती संवादातून दिली जाते. झाडांचे महत्व आणि सुधारणाते पर्यावरण यावर भाष्य केले जाते , वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून पाण्याची साठवणूक कशी केली जाते या बाबतची माहिती दिली जाते. 

पथनाट्य  संपल्यानंतर "आपलं घर" या  नाट्य संस्थेचा प्रमुख विनोद गरुड याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितलं की शहर स्वच्छते विषयी मनपाचे असलेले नियम ,माहिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कंपोस्ट खतांची माहिती यावर आधारित १८ - २० मिनिटांचे प्रहसन लिहिले असून त्याचे सादरीकरण आम्ही दरदिवशी ३ ठिकाणी करतो असा हा ३० दिवसांचा कार्यक्रम असल्याचे सांगून त्याच्या या चमूत  निरंजन केसकर,अविष्कार ठाकूर, स्वराज अपूर्वा, विशाल साठे, मोनिया बनकर , गौरी डांगे,नितु सहानी, वैष्णवी लव्हाळे, रेवती शिंदे आदी युवक-युवती या पथनाट्या सहभागी आहेत. गाण्यांच्या ओळी , त्यावरील तालबद्ध नृत्य आणि संवादाच्या माध्यमातून हे प्रहसन पुढे सरकतं. त्याचबरोबर स्व्च्छता मोहीम , रेन वॉटर हार्वेस्टिंग , आणि कंपोस्ट खतं यांच्या माहितीचा प्रसार अवघ्या २० मिनिटात होतो. 

पंथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनाचं उत्तम माध्यम हाताळल्या बद्दल मनपाचे धन्यवाद मानावेत तेवढे थोडेच तर ते सादर करणाऱ्या "आपलं घर" च्या कलाकारांना सलाम.!    

Post a Comment

0 Comments