चारही मुलींची हत्या करणारी "ती" आईच होती

चारही मुलींची हत्या करणारी "ती" आईच होती


 
वेब टीम चंदीगड: पुन्हाना पोलीस ठाण्यातील पिपरौली गावात चार मुलींची हत्या  केल्याचा आरोप त्यांच्या आईवर करण्यात आला आहे. झोपेत असलेल्या मुलींची गळा चिरून हत्या केल्यानंतर तिने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिच्या पतीने सांगितले. पतीने तक्रार केल्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला गंभीर जखमी असून, तिला उपचारासाठी नल्हड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले होते. हे तिचे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीपासून तिला एक आणि दुसऱ्या पतीकडून चार मुली होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या महिलेच्या पतीनेच तिच्याविरोधात तक्रार केली आहे. गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तो गेला होता.रात्री तीन वाजताच्या सुमारास तो घरी परतला. त्यावेळी त्याची पत्नी घरात तडफडत होती. त्याने आरडाओरड केली असता, ते ऐकून शेजारील काही जणांनी पोलिसांना कळवले. तर चार लहान मुली घरात मृतावस्थेत आढळून आल्या.
पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला त्याने महिनाभरापूर्वी तिच्या मामाकडे सोडले होते. त्याला महिलेने विरोध केला होता. मुलगी आपल्याकडेच राहावी असे तिला वाटत होते. पतीने तिला मामाकडे पाठवल्यानंतर तिने अन्य चार मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिळाली आहे.
मुलगा होत नसल्याने होती त्रस्त
लग्नानंतर त्यांना चारही मुली झाल्या. तिला मुलगा हवा होता. मुलगा होत नसल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. तिने चारही मुलींची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले.

Post a Comment

0 Comments