ड्रेनेजलाईनच्या खोदकामातून ताजा झाला खापरीनळाचा इतिहास

 ड्रेनेजलाईनच्या खोदकामातून ताजा झाला खापरीनळाचा इतिहास जिल्हाधीकारी कार्यालयाकडे जाणारया रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी कोडकं सुरू आहे. त्यासाठी चांगला ७ फूट खोल असा चार खांदला जातोय आणि मध्येच खड्ड्यात चुनखडी मिश्रित माती लागते समोरच वस्तू संग्रहालय असल्याने साहजिकच तिथल्या कर्मचाऱ्यांचं विशेषतः नारायण राव आव्हाड यांचं लक्ष तिथे गेलं जिज्ञासे पोटी त्यांनी तिथे जाऊन त्या मातीची पाहणी केली तर तिथे चुनखडी मिश्रित मातीसह खापरी नळ योजनेचे तुकडे आढळून आले.सलग १० फूट लांबीची जल वाहिनीचे अवशेष तेथे आढळून आले. त्यांनी ते सगळे अवशेष गोळा केले आणि आता ते वस्तू संग्रहातील पुरातन वस्तूंच्या खजिन्यात जमा करण्यात आले. 

खापरी जल वाहिनी हि चाँदबीबीचा वजीर मलिक अंबर ह्याने १५ व्या शतकात तत्कालीन नगरकरांना पाणी पुरविण्यासाठी निर्माण केली. कापूरवाडी तलावातून त्या काळात शहरातील कासीमखानी महाल (सध्याचे जिल्हाधिकारी निवास) , बारातोटी कारंजा , बेंडकुळी बाग (मार्केट यार्ड),नालेगावातील मारुती मंदिराजवळील कारंजा, तोफखान्यातील सोळातोटी कारंजा, झेंडीगेट परिसरातील टपाल कारंजा, सैदूचा कारंजा (कोठला भाग)  आणि हातमपुऱ्यातील कारंजा अश्या तत्कालीन पूर्ण गावाला या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जायचा. त्याचेच अवशेष शहरातील खोदकामात वारंवार सापडतात. 

मात्र हि जलवाहिनी टाकण्याची किमया करणाऱ्या मलिक अंबरचा इतिहासही तितकाच रंजक आहे. मलिक अंबरच्या लहानपणीच त्याला ख्वाजा बगदादी ला गुलाम म्हणून विकले गेले होते . या ख्वाजा बगदादीने पुढे त्याला चंगेजखानाला विकले, त्याच्या बरोबरच तो नगरला आल्याचा इतिहास आहे . आपल्या कर्तबगारीने तो पुढे चांदबिबीचा वजीर बनला. 

आज खापरी नळाचं काही अवशेष सापडले त्या निमित्तानं या नळयोजनेच्या निर्मात्याच्याही इतिहासाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

Post a Comment

0 Comments