आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

मिक्स व्हेज थालीपीठ 

साहित्य : सर्व प्रमाण छोट्या वाटीने घेणे. १ वाटी गाजर किस, १ व्हती लाल भोपळा किस, १ वाटी काकडी किस, प्रत्येकी १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , पालक ,मेथी , पाव वाटी बाईक चिरलेला पुदिना.   

मध्यम आकाराच्या वाटीचे प्रमाण 

तीन वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी डाळीचे पीठ, १/२ वाटी नाचणी सत्व , १/२ वाटी मक्याचे पीठ , १/२ वाटी तांदळाचे पीठ , तीळ , ओवा, आले लसूण पेस्ट, मीठ , हळद तिखट. 


कृती : सर्व पीठे एकत्र करून घेणे. त्यामध्ये सर्व किसलेल्या भाज्या, बारीक चिरलेल्या पालेभाज्या घालणे. चावी प्रमाणे मीठ, तिखट, ओवा,तीळ,आलेलसूण पेस्ट घालून पिटत चांगले मळून घेणे. लागले तरच पाण्याचा हात लावणे. 

कढईत तेल घेणे छोटे छोटे गोळे घेऊन पुरी एवढे थालीपीठ थापणे. छान खरपूस भाजून घेणे . लोण्या बरोबर सर्व्ह करणे. 

टीप : याप्रमाणे सिझनल भाज्या आपण वाढवू शकतो. हिवाळ्यामध्ये बाजरीचे पीठ सुद्धा मिक्स करू शकतो यामुळे सर्व भाज्या चवीने खाल्ल्या जतात. त्याच बरोबर गाजर , भोपळा, यासारख्या भाज्यामधून व्हिटॅमिन A मिळते. काकडीमुळे पित्तशमनही होते. सर्व भाज्यांमुळे भरपूर फायबर सुद्धा मिळते व पोथी भरते.      

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       



Post a Comment

0 Comments