कंगनाला कोर्टाने ठरवून दिली " वेळ "
वेब टीम नगर :मुंबई पोलिसांनी काढलेल्या समन्स नंतरच्या वॉरण्टवर अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक किंवा कोणत्याही कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र, ८ जानेवारी २०२१ रोजी दोघींनी दुपारी १२ ते २ या वेळेत वांद्रे पोलिसांसमोर हजर राहावे, असे निर्देशही कोर्टाने दिले.
वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कंगना आणि रंगोली यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज दुपारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देत मोठा दिलासा दिला. मात्र, येत्या ८ जानेवारीला पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असल्याचे कोर्टाने सांगितले. दरम्यान, ८ जानेवारी रोजी कंगना आणि रंगोली या दोघी पोलिसांसमोर हजर होतील, अशी ग्वाही ॲँड. सिद्दिकी यांनी दिल्यानंतर हायकोर्टाने तसे निर्देश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.
0 Comments