नगर बुलेटीन

  नगर बुलेटीन 

कृषिकन्या वैष्णवी हराळ हीने साकारला गुंडेगावचा नकाशा

      वेब टीम नगर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील  विद्यार्थिनी वैष्णवी रतन हराळ हिने रांगोळीद्वारे गावचा नकाशा सादर केला. या प्रतिकृतीत तिने गावचे चित्रण रेखाटले.  या नकाशाद्वारे तिने गावातील मंदिरे, शेती, विहिरी,  बस स्थानक, दवाखाना यांचे चित्रण रेखाटले. या भव्य नकाशाद्वारे तिने गावाची धार्मिक, सांस्कृतिक पद्धती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

     यावेळी  सरपंच संजय कोतकर, डॉ.गजानन भापकर, उद्योजक संदीप धावडे, रतन हराळ, संतोष भापकर, रमेश गिरवले, अशोक हराळ, संजय भापकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

     या कलाकृतीसाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे, प्रा.अनुप दरांदले,  प्रा.सोमनाथ दरंदले, प्रा जगताप  तसेच आदी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे कृषिकन्या हराळ वैष्णवी हिने सांगितले. तिच्या या उपक्रमाचे पंचक्रोशितून अभिनंदन होत आहे.

अहमदनगर महाविद्यालयाचा एम.एस.सी

 कॉम्प्युटर सायन्सचा १०० टक्के निकाल

    वेब टीम  नगर - पुणे विद्यापीठाच्यावतीने नुकतीच जाहिर झालेल्या एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्स परिक्षेमध्ये अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, उपप्राचार्य ए.व्ही.नागवडे, डॉ.बी.एम.गायकर सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना उप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

     एमएससी कॉम्प्युटर सायन्स विभागात कु.प्रतिक्षा नितीन बोरा हिने 82.50 टक्के मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला तर केशर डोळसे हिने 78.60 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळवला आणि कु.गौरी नगरकर हिने 78.5 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला.

     यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.बार्नबस म्हणाले कि, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात महाविद्यालय आणि प्राध्यापक नेहमी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर्जेदार शिक्षण देत आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात  यशस्वी होत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सध्या महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. प्राध्यापकही ऑनलाईनच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत आहे.

स्पर्श संस्था दुर्लक्षित महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार : प्रवीण साळवे


वेब टीम नगर – लॉकडाऊन काळात वन्यप्राणी व पर्यटनस्थळांवरील प्राण्यांवर ओढवलेली उपासमारी दूर करण्यासाठी योगदान देणाऱ्या नगरच्या स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने आता स्पंदन उपक्रमाच्या माध्यमातून शहरात विविध भागात काच, कागद, कचरा व भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना करोना पासून बचाव होण्यासाठी संरक्षक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. या दुर्लक्षित महिला वर्षानुवर्ष उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने या महिलांना लवकरच विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्श संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी दिली.

स्पंदन उपक्रमांतर्गत आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या महिलांना शिवणकाम, विणकाम, लोणचे पापड, मसाले बनवणे, ब्युटी पार्लर, मेहंदी इत्यादी व्यवसायांच्या प्रशिक्षण शिबिरांचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला सुद्धा बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. कागद कचरा गोळा करणाऱ्या महिलांना देण्यात आलेलेया सेफ्टी किट मध्ये सॅनिटरी पॅड, हॅण्ड ग्लोज, गमबुट, हॅण्ड वॉश, मास्क, कपड्याचा व अंगाचा साबण इत्यादी वस्तू देण्यात आल्या. सामाजिक समता विचारधारा फाउंडेशन नगरचे अध्यक्ष सुनिल भोसले यांनी यावेळी मदत केली.

     स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांना दानशुरांच्या मदतीची गरज आहे. दानशुरांनी सेफ्टी किटसाठी व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संस्थेस सढळ हाताने आर्थिक मदत करावी. अधिक माहितीसाठी 9075512802 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी केले आहे.

जि.प.च्या कायदेशीर सल्लागारपदी अ‍ॅड.अभिषेक भगत

    वेब टीम  नगर - जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व कामकाज पाहण्यासाठी नगरचे विधिज्ञ अभिषेक भगत यांची जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, माजी आ.चंद्रशेखर घुले आदिंनी अभिषेक भगत अभिनंदन केले आहे.

     अ‍ॅड.भगत यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात जिल्हा परिषदेवतीने दिवाणी व फौजदारी कामे, औद्योगिक व कामगार न्यायालयातील कामे तसेच जिल्हा ग्राहक मंच, सहकार न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व प्रकारणांची कामे पाहणे. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांच्या न्यायालयातील कामकाज, जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे व खाते प्रमुखांकडील न्यायालयातील सर्व प्रकारणांचे कामकाज पाहणे, न्यायालयीन विषयी सल्ला देणे व मार्गदर्शन करणे आदि जबाबदार्‍या अ‍ॅड.अभिषेक भगत यांच्यावर सोपविण्यात आलेल्या आहेत.

     अ‍ॅड.अभिषेक भगत यांचा वकिल क्षेत्रात असलेल्या दांडग्या अनुभवामुळेच जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेमराज सारडा महाविद्यालयातील नऊ

 छात्रांची भारतीय सैन्यादलामध्ये निवड

कार्याध्यक्ष अजित बोरा : एनएनसीचे छात्र सारडा महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवतील

वेब टीम नगर – सारडा कॉलेज मधील प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सर्व क्षेत्रात यश संपादन करत आहेत. एन.एन.सी विभागा कडून छात्रांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच सारडा महाविद्यालयाच्या नऊ छात्रांची भारतीय सैन्यादालामध्ये निवड होवून त्यांना भारतमातेची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. हे सर्व भावी सैनिक आपापले कर्त्यव्य बजावत सारडा महाविद्यालायचे नावलौकिक वाढवतील, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी केले.

 पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी व एन.सी.सी विभागातील नऊ छात्रांची भारतीय सैन्यादलामध्ये निवड झाली आहे. यात संचित नवले, किशोर होडगर, विशाल गायकवाड, चांगदेव म्हस्क, नंदकिशोर खंडागळे, मयुर काळे, गणेश बोरुडे या सात जणांची निवड भारतीय थलसेनेत तर समीर शेख आणि मयुर पवार या दोघांची भारतीय हवाई दलामध्ये निवड झाली आहे. या सर्वांना महाविद्यालयाचे एन.सी.सी विभाग प्रमुख लेफ्टनंट अंकुश आवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी छात्रांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक आणि कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक डॉ. सुजित कुमावत आदी उपस्थित होते.

वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा


जन आधार सामाजिक संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या

वेब टीम नगर - नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गावा पर्यंतचा (बायपास) रस्त्याचे सहा महिन्यापुर्वी झालेले काम अत्यंत निकृष्ट झाले असून, सदर कामाची चौकशी करावी व झालेले निकृष्ट काम पुन्हा चांगल्या दर्जाचे करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, गौरव बोरकर, सुशील साळवे, मयुर रोकडे, हनुमंत कलापुरे, मच्छिंद्र गांगर्डे, संतोष त्रिंबके, शाहिद सय्यद, अमोल भंडारे, दीपक गुगळे, गणेश निमसे, अमित गांधी, अजय सोळंकी आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

नगर-सोलापूर रोड वरील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट पर्यंन्त रस्ता सहा महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या१० किलोमीटर रोड साठी २. ५ कोटी आणि पुढील८ किलोमीटर रोड साठी १कोटी असा १८ कि.मी. साठी तब्बल ३. ५कोटी निधी मंजूर झाला होता. डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी रोडच्या बाजूने अद्याप गटारीचे काम करण्यात आलेले नाही. या रोड च्या दरम्यान साधारण तीन पुल लागतात. या पुलावर कुठल्याही प्रकारचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. वाकोडी फाट्यावरून पुढे जात असताना लागणारा पहिला पूल हा पूर्णपणे खचला आहे. तरीही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतुक सुरु आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस कठडे देखील बसवलेले नाहीत. तसेच जीर्ण झालेल्या पुलामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याचा धोका आहे. सहा महिन्यात अर्ध्याच्यावर रोड अनेक ठिकाणी खराब झाला आहे. रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारास कोणत्या निकषावर बिल अदा करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदर काम चांगल्या दर्जाचे न झाल्यास अधिकार्‍यांच्या खुर्च्यांचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरच्या वतीने  कॅन्सर योध्दांस दिवाळी भेट


वेब टीम नगर- कॅन्सर झाला की ती व्यक्ती व त्यांचे नातेवाईक खचतात कारण पहिला होणारा खर्च तसेच बरा  होणारा का? यामुळे आरंभ ही संस्था याकरीताच काम करत आहे.तुम्ही हसत रहा,खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, गोळया घ्या, पथ पाळा, बरे व्हा कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास संपर्क साधा वेदनेशी लढणाऱ्या चेहऱ्यांना बळ देउयात हे आरंभचे ब्रीद आहे. असे प्रतिपादन आरंभचे अध्यक्ष चाँद शेख यांनी केले.

दिवाळीनिमित्ताने आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व सहकारी मित्र परीवाराच्या वतीने विळद घाट येथील डॉ.विखे पाटील हॉस्पीटल व झोपडी कॅन्टीन येथील मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सर योध्दांस दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी विखे पाटील हॉस्पीटलचे डॉ.भूषण निकम, मॅककेअर हॉस्पीटलचे डॉ सतीश सोनवणे, डॉ गरूड हॉस्पीटलचे डॉ.प्रकाश गरुड, आरंभचे अध्यक्ष चाँद शेख, तान्या मुलतानी, आरंभचे खजिनदार गणेश भोसले, जितेंद्र देवकर, विकास जाधव, नितीन भोसले, स्नेहा शेंदूरकर, शिवाजी जाधव, सुमन गवारी, वज्रेश्ववरी नोमुल, शर्मिला कदम, विवेक शिंदे, प्रदीप कनोजिया आदि उपस्थित होते.

डॉ.सतीश सोनवणे म्हणाले की,एखादया कॅन्सर समजला की,प्रथमत. ती व्यक्ती व नंतर घरातील सर्व व्यक्ती हतबल व निराश होते.सातत्याने कॅन्सरशी लढत असलेल्या रूग्णाना या निमित्ताने प्रेरणा ताकद तसेच त्यांच्या लढाईला साथ देण्याचे काम हे करत आहेत. प्रत्येक रूग्णांशी आरंभचे सहकारी जेव्हा संवाद साधत होते.तेव्हा प्रत्येकाच्या डोळयात आनंदाचे व आपल्याकरीता दुसरी व्यक्ती काहीतरी करते यांचा अभिमान दिसत होता. आरंभचे जे ब्रीद वाक्य आहे हे या निमित्ताने साथ होत आहे.

नकळतपणे या कॅन्सरयोध्दाचे हात आशिर्वादाकरीता डोक्यावर कधी येत होते हे समजत नव्हते. कुणी बेकरी,कुणी गृहीणी,दुकानदार,नोकरदार वयस्कर,तरूण असे विविध क्षेत्र व वयोगटातील योध्दे येथे लढत आहे.आज प्रत्येकजण आपल्या घरी दिवाळी साजरी करतो परंतू योध्दे व त्यांचे नातेवाईक मात्र हॉस्पिटलमध्येच….त्यामुळेच आरंभतील  पुनीत  हा ब्लडकॅन्सरपिडीत आहे त्याने या सर्वाकरीता पणती मनुके व उटण्याचा साबण दिवाळीची भेट दिली आहे.  

Post a Comment

0 Comments