३१ डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्क माफ

 ३१ डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्क माफ 


वेब टीम मुंबई :  घर खरेदीला चालना देण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘नरेडको’ महाराष्ट्राच्या वतीने शून्य मुद्रांक शुल्कची योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. या योजनेअंतर्गत घर खरेदी करताना कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. संघटनेच्या राज्यातील सुमारे एक हजार सदस्यांच्या प्रकल्पाचा या योजनेत सहभाग आहे.

करोना कालावधीत मंदीच्या खोल गर्तेत सापडलेल्या बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासाठी आणि घर खरेदीदारांना दिलासा म्हणून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३१ डिसेंबपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरी भागात उर्वरित ३ टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्क कपातीनंतर नरेडकोच्या सदस्यांसह काहींनी शून्य टक्के मुद्रांत शुल्क योजना जाहीर केली. या सर्वाचा परिणाम म्हणून दसरा-दिवाळीच्या कालावधीत मागच्या वर्षीच्या तुलनेत घरखरेदी वाढल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पुढील काळातही घरखरेदीला चालना देण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत शून्य मुद्रांक शुल्कची योजना नरेडको राबविणार आहे.अशी माहिती  नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी दिली. 



Post a Comment

0 Comments