आरोग्य आहार :पोहा बटाटा टिक्की

 आरोग्य आहार 

पोहा बटाटा टिक्की 


साहित्य : १ वाटी पोहे,आलं,लसूण , हिरवी मिरची पेस्ट, एक उकडलेला बटाटा , चमचाभर नाचणी सत्व कोथिंबीर व मीठ 

कृती : प्रथम १ वाटी जाड पोहे जास्त पाणी ठेऊन भिजवून घ्यावेत.  बटाटा स्मॅश करून घ्यावा. आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा नाचणी सत्व बाइंडिंग साठी , मीठ घालून सर्व पीठ एकत्रित मळून घ्यावे.छोट्या-छोट्या टिक्क्या , रव्यामध्ये घोळून बटर टाकून तव्यावर भाजून घ्यावेत. 

टीप: ह्या टिक्की अजून पौष्टिक करण्यासाठी त्यामध्ये गाजर,कोबी,आणि स्वीट कॉर्न घालू शकता. पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.   

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       


Post a Comment

0 Comments