मुख्याध्यापक संघाची जिल्हाधिकारी व सीईओ यांच्याशी चर्चा

 मुख्याध्यापक संघाची जिल्हाधिकारी व सीईओ यांच्याशी चर्चा

वेब टीम नगर - शासनाच्या आदेशानुसार सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावी वर्ग सुरू करण्याबाबत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना ही चाचणी करणे तसेच शालेय स्वच्छता व सर्व वर्ग सॅनिटायझर करणे या व विविध विषयांवर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले  तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर साहेब यांचे बरोबर चर्चा करण्यात आली.  यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, राजेश परजणे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  रामदास हराळ तसेच श्री. लाळगे  उपस्थित होते.

     याप्रसंगी  जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते  ‘ज्ञानकलश’ हे मासिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी प्राचार्य सुनिल पंडित, प्राचार्य अशोक दोडके, भाऊसाहेब रोहकले, विठ्ठल दळवी, प्राचार्य उल्हास दुगड, मुरलीधर अमृते, अशोक आमृते, रयत शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री. कन्हेरकर, जिल्हा मराठाचे विश्‍वस्त श्री.आठरे पाटील आदी उपस्थित होते

     यावेळी दि.२३  नोव्हेंबर पासून शासनाच्या परिपत्रका प्रमाणे नियोजन करून शाळा सुरु करण्याबाबत ठरले. तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना राबविणार असल्याचे प्राचार्य सुनिल पंडित यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments