जि.प.मुलींच्या शाळेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम

 जि.प.मुलींच्या शाळेचा  शिक्षक आपल्या दारी उपक्रम 


वेब टीम कर्जत : कोरोना काळात शाळा बंद असल्याने आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांच्या बौद्धिक विकासासाठी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाने दिलेले स्वाध्याय पुस्तिका संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जात गुणांकन करण्याचा अभिनव उपक्रम कर्जत जिल्हा परिषद मुलींची शाळेचे मुख्याध्यापक उद्धव थोरात आणि केंद्रप्रमुख भाऊसाहेब घोरपडे यांनी हाती घेतला आहे. अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष भेट न झालेले गुरूजन  अचानक घरी आल्याने विद्यार्थ्यांनी  सुद्धा त्यांचे आदरातिथ्य केले. 

                 कोरोना महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि विद्यालय बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालय यांनी ऑनलाईन शिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. मात्र या ऑनलाईन शिक्षण धडे घेताना ज्यांची आर्थिक क्षमता कमकुवत आहे असे विद्यार्थी यापासून सुद्धा दूर राहत आहे. अशाच होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कर्जत जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक उद्धव थोरात आणि केंद्रप्रमुख भाऊसाहेब घोरपडे यांनी एकत्र येत त्या विद्यार्थ्यांचा शोध घेत प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांच्या घरी जात त्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. यासह कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाने दिलेले स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आले होते. त्या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांनी कसे सोडविले आहेत. त्यानुसार गुणांकन करीत चुकीच्या उत्तरे लिहलेल्या ठिकाणी समजावत उजळणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसापासून गुरू आणि शिक्षकांपासून दुरावलेल्या विद्यार्थ्याना त्यांचे शिक्षक घरी दिसल्याने मोठे हायसे वाटले. अशा उपक्रम राबविताना आपल्या स्वताची आणि आपल्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात, मास्क वापरणे, सामाजिक अंतरपथ्य नियम देखील पाळण्याचे आवाहन मुख्याध्यापक थोरात आणि केंद्रप्रमुख घोरपडे यांनी केले.Post a Comment

0 Comments