पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली

पंडित नेहरू यांनी आधुनिक 

भारताची पायाभरणी केली

 किरण काळे : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नेहरू जयंती, बालदिन उत्साहात  

वेब टीम नगर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली. आजचा भारत याच भक्कम पायाभरणी वरती उभा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. सावली सामाजिक संस्थेतील वंचित मुलांना बालदिनानिमित्त दिवाळीचे फराळ, फुगे, फळे यांचे वाटप काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते. 

काळे म्हणाले की, सावली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नगर शहरामध्ये गेली अनेक वर्षांपासून वंचित, उपेक्षित घटकातील मुलांना घडविण्याचे काम सुरू आहे. मुले ही देशाचे उद्याचे भविष्य आहेत. सावलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम केले जात आहे. याबद्दल संस्थेचे प्रमुख नितिन बनसोडे आणि सहकाऱ्यांचे  कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

यावेळी काळे यांच्यासह काँग्रेसचे विशालभाऊ कळमकर, प्रवीणदादा गीते, चिरंजीवभाऊ गाढवे, संकेत लोकरे, गणेशदादा आपरे, मयूर माने, प्रमोद अबुज, अमित भांड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



काँग्रेसच्या वतीने मुलांना "ग्रंथपेटी" भेट 

बालदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावली संस्थेतील मुलांना ग्रंथपेटी भेट देण्यात आली. या पुस्तकांच्या पेटीमध्ये मुलांना अवांतर वाचनासाठीची पुस्तके तसेच यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी कथा, स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानच्या कथा, पर्यावरण, गोष्टींची पुस्तके आदी विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. काळे यांनी यावेळी मुलांना या ग्रंथ पेटीचा पुरेपूर उपयोग करत आपले ज्ञान वृद्धिंगत करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments