साहेबान जहागीरदार यांना रोटरीचा कोरोना संवेदनवीर पुरस्कार प्रदान

 साहेबान जहागीरदार यांना 

रोटरीचा कोरोना संवेदनवीर पुरस्कार प्रदान

कोरोनाने मृत पावलेल्यांची माणुसकीच्या भावनेने अंत्यविधीचे कार्य केल्याबद्दल

वेब टीम नगर -  कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने कार्य केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रेटीच्या वतीने साहेबान जहागीरदार यांना कोरोना संवेदनवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्या हस्ते जहागीरदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी डॉ. रफिक मुन्शी, न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, अजित पवार, रोटरीचे प्रकल्प प्रमुख जावेद शेख, सचिव सुयोग झंवर उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीत शहरासह जिल्ह्यात मृत्यूदर वाढला असताना साहेबान जहागीरदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध धर्माच्या धर्म विधीनुसार त्यांचा अंत्यविधी होण्यासाठी कार्य केले. अमरधाम, ख्रिश्‍चन दफनभूमी तर मुस्लिम कब्रस्तानमध्ये त्यांनी कोरोनाने मृत पावलेल्यांचा अंत्यविधी केला. काहींचे घरचे देखील येण्यास तयार नसताना त्यांनी माणुसकीने अंत्यविधी करण्याचे कार्य केले. अनेक महिने आपल्या कुटुंबापासून दूर विलगीकरणात राहून त्यांनी हे कार्य केले. या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना कोरोना संवेदनवीर पुरस्कार देत असल्याचे रोटरीचे जावेद शेख यांनी सांगितले. जहागीरदार हे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष असून, त्यांचे विविध माध्यमातून सामाजिक कार्य शहरात सुरु आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments