घरकुल वंचित दिव्यांग मुलांसह अनामप्रेम संस्थेत साजरी करणार दिवाळी

घरकुल वंचित दिव्यांग मुलांसह 

अनामप्रेम संस्थेत साजरी करणार दिवाळी

घरासाठी जागा मिळाल्याचा होणार आनंदोत्सव साजरा

वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अजरापना घर आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी इसळक-निंबळक येथील स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत घरकुल वंचित दिव्यांग मुलांसह दिवाळी साजरी केली जाणार आहे. तर घरासाठी जागा मिळाल्याचा व कोरोनाचे संकट टळत असल्याने आनंदोत्सव साजरा करुन आरोग्यनामा प्रसिध्द केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणवादी चळवळीचे एस. नाथन, वनराई संस्थेचे अमित वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, कॉ.बाबा आरगडे, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अनामप्रेमचे अजीत कुलकर्णी, डॉ. महेश मुळे, डॉ. अंशू मुळे उपस्थित राहणार आहेत.  

देशात कोरोनाचे सावट कमी होत असून, मृत्यूदर अत्यंत कमी झाला आहे. देशातील नागरिक कोरोनाच्या महामारीपासून मुक्त होत असताना त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढली आहे. यासाठी योग, प्राणायाम व आयुर्वेद महत्त्वाचे ठरले आहे. प्रत्येक भारतीयांच्या अंगणात तुलसीचे रोपे असतात त्याबरोबर गुळवेलची रोपे लावण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. गुळवेल ही आरोग्यासाठी जादुची कांडी असून, प्रतिकारशक्ती वाढविण्यास ती रामबाण उपाय म्हणून कार्य करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच दिव्यांगांची दिवाळी गोड करुन त्यांना फराळचे वाटप देखील केले जाणार आहे. या उपक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, किशोर मुळे, पुनम पवार, सुरेखा आठरे आदी प्रयत्नशील आहेत.
Post a Comment

0 Comments