धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून साजरी करणार

धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून साजरी करणार

पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्‍यांना देणार मानवंदना

बियांचा होणार तळीभांडार 

 वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने दिवाळीत प्रदुषणमुक्ती व वन हीच खरी धनसंपदा असल्याचा संदेश देत शहरातील घरकुल वंचित निंबळक येथे होत असलेल्या प्रस्तावित गृह प्रकल्पाच्या परिसरात शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून साजरी करणार आहे. तर यावेळी पावीर पूजन करुन पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्‍यांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच बियांचा तळीभांडार करणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 


या वनत्रयोदशी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वनराई संस्थेचे अमित वाडेकर, जि.प. सदस्य माधवराव लामखडे व कॉ. बाबा आरगडे उपस्थित राहणार आहे. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात १ गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होणार आहे. घरे उभी करत असताना वनधनराईची शपथ घेऊन वृक्षरोपण व संवर्धनाची जबाबदारी देखील घरकुल वंचित पार पाडणार आहेत. 

तसेच यावेळी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, पद्मश्री पोपट पवार, सिनेअभिनेते अमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावली असताना त्यांना वनत्रयोदशीच्या दिवशी त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच या भागात पाणी, वीज व रस्ते असे पावीर पूजन होणार आहे. या उपक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, जालिंदर बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत.  



Post a Comment

0 Comments