सामाजिक संस्थांनी समाजजागृतीचे कार्य करावे :जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील

सामाजिक संस्थांनी समाजजागृतीचे कार्य करावे :जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ.वतीने टाळेबंदीमुळे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

वेब टीम नगर : सामाजिक संस्थांनी समाजजागृतीचे कार्य प्रभावीपणे राबवावे. शासन व लाभार्थी यांच्यामधील दुवा म्हणून संस्थांनी काम केले पाहिजे. या कोरोना विरोधी मोहिमेत युवकांनी पुढाकार घेऊन कार्य करण्याची अपेक्षा आहे. जिल्हा क्रिडा कार्यालय व जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांना नेहमी सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले.

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांची भेट घेऊन युवक कल्याण योजनेअंतर्गत मागील वर्षीचे टाळेबंदीमुळे प्रलंबीत पडलेले प्रस्ताव यावर्षी मंजूर करण्याची मागणी केली यावेळी पाटील बोलत होते. क्रीडा अधिकारी पाटील यांनी शिष्टमंडळाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दाखविला. यावेळी झालेल्या चर्चेत क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, मार्गदर्शक विशाल गर्जे, बाळासाहेब पवार आदींनी सहभाग नोंदविला. जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे, सागर आलचेट्टी यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांचा जिल्ह्यातील एन.जी.ओ. च्या वतीने सत्कार केला.

प्रास्ताविकात अ‍ॅड. महेश शिंदे यांनी जिल्हाभरातील जवळपास दीडशे ते दोनशे संस्था शासना समवेत कृतिशीलपणे उपक्रम राबवित आहेत. राज्यामध्ये हे असोसिएशन समन्वयाने कार्य करीत असल्याची माहिती दिली. द युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने सागर आलचेट्टी यांनी टॅलेंट ऑफ अहमदनगर उपक्रमाचे भिंतीपत्रक क्रीडा कार्यालयास देण्यात आले. राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांनी असोसिएशनच्या सामाजिक कार्याबद्दल संस्था प्रतिनिधींचे कौतुक केले. 



Post a Comment

0 Comments