दिवाळी शॉपिंग महोत्सव

दिवाळी शॉपिंग महोत्सव 

चाहूल दिवाळीची

दुकाने सजू लागली, ग्राहकांचीही बाजारात गर्दी  


हळूहळू कोरोनाचे  मळभ दूर होऊ लागले आणि नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करू लागले दुकानही सजावटीच्या वस्तूंनी सजायला लागली पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चाहूल लागायला सुरवात झाली. 

सोनपावलांनी दिपावलीचे आगमन होतंय हे चैतन्य वातावरणात दिसायला लागले,  दिवाळी म्हटलं की रंगरंगोटीची  तयारी सुरू होते रंगांच्या दुकानाच्या मांडण्यात रंगांच्या डब्या पिशव्यांनी त्याची जागा व्यापलेली आहे.

रांगोळ्यांचीही दुकानही रंगीबेरंगी रंगाने नवा साज ल्यायली आहेत. नक्षीदार पणत्याही बाजारात दिसायला लागल्या,उटणं सुगंधी साबण बाजारात आपलं अस्तित्व दाखवायला लागली. नाही म्हटलं तरी नवनवीन प्रकारच्या विजेच्या रोषणाईचे दिवे झगमगायला लागले.हे सगळं पाहून ग्राहकांनी बाजारात गर्दी केली नसती तरच नवल !

दिवाळीत दिव्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने लाल मातीच्या विविध आकाराच्या प्रकाराच्या पणत्या बाजारात दिसत असून त्याचबरोबरीने आता  चिनी मातीच्या अन्य धातूंच्याही  दिव्यांची रेलचेल दिसते यंदा बाजारात साठ रुपये डझनापासून ते तीनशे रुपये डझनापर्यंतच्या अनेक प्रकारच्या पणत्या असून त्यामध्ये ठेवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या सुगंधी वड्या वाती उपलब्ध असून त्यांचीही किंमत रु.१० इतकी आहे. 

दिवाळीच्या निमित्तानं महिलांची घरासमोर दारासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्याची चढाओढ सुरू असते. त्या शोभिवंत रांगोळ्यासाठी देखील अनेक प्रकार रांगोळ्यांमध्ये देखील अनेक प्रकार उपलब्ध असून ठिपक्यांच्या रांगोळी पासून ते फ्रीहँड रांगोळी पर्यंत अनेक प्रकारच्या रांगोळ्यांचे स्टिकर्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.रांगोळ्या काढण्यासाठी विविध प्रकारचे हार्डबोर्ड स्टेन्सिल आणि त्याला साजेसे रंगही उपलब्ध आहेत.रांगोळी मध्ये दोन बोटांची तीन ,पाच बोटांची रांगोळी रेखाटण्यासाठी रांगोळ्याच्या बाटल्या ही उपलब्ध आहेत पांढरे रांगोळी दहा रुपये किलो तर रंगीत वीस रुपये किलो दरात उपलब्ध आहे.  निरनिराळ्या चाळण्याचे स्टेन्सिल हार्डबोर्ड स्टेन्सिल आकाराप्रमाणे 25 रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

 झगमगणारी आकाशदिवे घराच्या दाराची शोभा वाढवतात सध्या बाजारात अनेक प्रकारचे शोभिवंत आकाश दिवे उपलब्ध आहेत त्यात प्लास्टिक कापडी कागदी असे निरनिराळे नक्षीकाम असलेले आकाशदिवे मनाला भुरळ घालतात रंगीबेरंगी आकाश दिव्यांनी दुकाने सजली आहेत.  हे आकाशदिवे सव्वाशे रुपयांपासून ते 725 रुपयापर्यंत दरात व आकार - प्रकारांवर उपलब्ध आहेत. विजेच्या रोषणाईचे निरनिराळ्या प्रकारचे दिवे सध्या बाजारात उपलब्ध असून घरांवर व दुकानांवर केलेली रोषणाईचा झगमगाट दिवाळीची चाहूल देऊ लागला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही पूर्ण संपलेला नाही त्यामुळे त्याचा धोका कायम आहे तेव्हा ग्राहकांनी गर्दी न करता मास्क घालून आणि सामाजिक अंतर्पथ्य पाळूनच बाजारात वावरावे.अनेक दुकानदारांनी स्वतःच्या आणि ग्राहकांच्या ही सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर मशीन्स बसविल्या आहेत.  त्याचाही नागरिकांनी वापर करावा गर्दीत वावरतानाही पुरेपूर काळजी घेतल्यास कोरोनावर नियंत्रण कायम ठेवता येईल. 


Post a Comment

0 Comments