दिवाळी शॉपिंग महोत्सव

दिवाळी शॉपिंग महोत्सव 

 "सच्चिदानंद केटरर्स”चे खमंग, खुसखुशीत फराळाचे पदार्थ

 पूर्वीच्या काळी घराघरातून भाजण्या - तळण्याचे खमंग वास येऊ लागले की दिवाळीची चाहूल लागायची. मात्र हल्लीच्या काळात हे प्रमाण कमी झालेले दिसते. आजकाल नौकरी करून घर सांभाळणाऱ्या महिलांकडे फराळाचे करण्यासाठी वेळ नसतो.मात्र चाळीस वर्षांपूर्वी तयार फराळाचे पदार्थ करून विकायचे हा भविष्यात मोठा व्यवसाय होऊ शकतो असं म्हटलं असतं तर ते कोणालाही खरं वाटलं नसत.मात्र हीच गोष्ट त्या काळात सच्चिदानंद कुलकर्णी यांनी ताडली आणि दर वर्षी ते दिवाळीचे फराळ तयार करून विकू लागले. बघता बघता आज या व्यवसायानं उणी पुरी ४० वर्ष पूर्ण केली.

कुलकर्णी कुटुंबिय ६०-७० वर्षांपासून केटरिंगच्या व्यवसायात स्थिरावले आहेत. आणि गेल्या ४० वर्षांपासून ते दर्जेदार,हायजेनिक फराळासाठी लौकिक कमावून आहेत. सच्चिदानंद केटरर्स चा फराळ म्हणजे अस्सल किराणा साहित्य वापरून स्वच्छतेची परिमाणं पाळून केलेले दर्जेदार फराळाचे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागतात. पदार्थांच्या दराबाबत कोणत्याही प्रकारची वाच्यता करता नगरकरच नव्हे तर पुणे, नाशिक, औरंगाबादच काय तर परदेशातील खवय्यांनाही या फराळाने भुरळ घातली आहे. चकल्या,करंज्या, अनारसे ,मोतीचूर लाडू हि तर सच्चिदानंद केटरर्सच्या फराळाची खासियत.

 


सच्चिदानंद केटरर्सचे लाडू चक्क - महिने टिकतात कारण ते तयार करतानाच अस्सल पदार्थ वापरून पारंपरिक पाककृतीतून तयार केले जातात. अनारश्याचे पीठ तयार करण्यापूर्वी दिवस अगोदर तांदूळ भिजत घातला जातो, त्यानंतर त्यात गूळ घालून मिश्रण तयार केले जाते. चकलीची भाजणीही अगदी पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने चकल्या कुरकुरीत , खुसखशीत होतात. त्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते.   

                                                                                        


केटरिंगच्या व्यवसायात कुलकर्णी कुटुंबीयांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे.दिवाळी फराळाच्या व्यवसायात नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे . पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये त्या जातीने लक्ष घालतात,नव्हे त्याची भाजणी , भिजवणी आदी कामे त्या स्वतः करतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी निर्माण झालेली भिती अजूनही कायम आहे.त्यामुळे पदार्थ तयार करतांना पुरेशी काळजी घेतली जाते.तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर, आदी नियम,हायजिनचेही नियम पाळून पदार्थ केले जातात.कोरोनाचे सावट लक्षात घेऊन कच्चा मालाच्या किमती वाढल्या असल्या तरी यंदा फराळाचे भाव गेल्यावर्षी इतकेच ठेवले आहेत.  



करंजी , अनारसे , मोतीचूर लाडू , बेसन लाडू, रवा लाडू,चकली,कडबोळी, शंकरपाळे , चुरमा वडी,साधी शेव,मसाला शेव , भाजक्या - कच्च्या , तळलेल्या पोह्यांच्या चिवडा , मक्याच्या पोह्यांचा चिवडा , भडंग चिवडा , खरी बुंदी , बालुशाही ,सोनपापडी, आदी खमंग आणि खुसखुशीत पदार्थ ग्राहकांच्या दिमतीला येत  आहेत. यात बेसन लाडू , चुरमा वडी , शंकरपाळे , साधी शेव , भाजके पोहे चिवडा , खरी बुंदी, बालुशाही आड पदार्थ ३०० रु किलो तर शुद्ध तुपातील पदार्थ करंजी, अनारसे, मोतीचूर लाडू आदी पदार्थ ५२० रु किलो दरात उपलब्ध आहेत.

 


Post a Comment

0 Comments