आरोग्य आहार

आरोग्य आहार 

मिक्स व्हेज पोळी रोल

साहित्य : ३ रंगांच्या ढोबळी मिरची , स्वीट कॉर्न , चीज , पनीर , गाजर , लिंबू, मीठ, साखर , आलं-लसूण पेस्ट, २ तयार पोळ्या, चिंच - खजुराची चटणी , बारीक शेव , गरम मसाला , पावभाजी मसाला. 

कृती: प्रथम कढई मध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेल्या ढोबळी मिरची, वाफवलेलेल स्वीट कॉर्न , गाजराचे बारीक तुकडे घालून एक वाफ आणणे. त्यानंतर त्यामध्ये बारीक कुस्करलेले पनीर , मीठ , आलं लासूंऊन हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबू , साखर, गरम मसाला व पावभाजी मसाला टाकून एक वाफ आणणे. हि भाजी गार करायला ठेवणे. 

प्रथम एक पोळी तव्यावर बटर टाकून भाजून घेणे.नांतर पोळीवर वरील भाजीचे सारण पसरवा त्यावर चीज किसून टाका नंतर पोळीचा रोल करा हा रोल तव्यावर बटर टाकून खरपूस भाजून घ्या. भाजून झाल्यावर सुरीने रोल अर्धा कापून घेणे त्यावर चिंच- खजुराची चटणी स्प्रेड करून , बारीक शेव भुरभुरून सर्व्ह करा. 

Post a Comment

0 Comments