नगरटुडे बुलेटिन

 नगरटुडे बुलेटिन 

कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद आहे

गुलशन जग्गी : भाजपाचे  नगर शहर-जिल्हा प्रशिक्षण शिबीर उत्साहात

    वेब टीम  नगर - भारतीय जनता पार्टीचा उदय हा संघर्षातूनच झालेला आहे. आज जरी देशात भाजपाची सत्ता असली तरी यासाठी अनेकांनी बलिदान योगदान दिले आहे. ही सत्ता एका दिवसात आलेली नाही. पक्षाची ध्येय व धोरणे ही निश्‍चित करुन कार्यकर्ते ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे पक्षात कार्यकर्त्यांला मोठे स्थान आहे. शिस्त व नियोजन ही पक्षाची मुळ धारा आहे, कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद आहे. यामुळेच पक्षाची वाटचाल हळूहळू होत गेली तरी इच्छित साध्य केलेले आहे. परंतु कार्यकर्त्यांनी एवढ्यावर न थांबता आपण आपल्याला दिलेल्या जबाबदारी भान ठेवून पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार काम केले पाहिजे. त्याचबरोबर पक्षासाठी योगदान देणार्‍या ज्येष्ठांचाही आदर्श व आदर ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्या कार्यक्षेत्रात काम करतो, त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. पक्षात काम करताना अडचणी येत असतात, त्या पक्ष पातळीवरच सोडविल्या गेल्या पाहिजे. प्रत्येकाला पदाची अपेक्षा असते, परंतु मिळेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे काम करुन पक्षाचे ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविले पाहिजे, असे मौलिक विचार भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांनी कार्यकर्त्यांनापुढे मांडले.

          भाजपा नगर शहर जिल्हा कार्यक्रमा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे,  उपमहापौर मालनताई ढोणे, अ‍ॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, सरचिटणीस तुषार पोटे, प्रा.मधुसूदन मुळे, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके आदि मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, आज देशात तसेच अनेक राज्यात भाजपाची सत्ता आहे, त्यांचे प्रमुख श्रेय हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्ष देतो. त्यामुळे पक्षात कार्यकर्ता हा महत्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आत्मनिर्भर भारत, गरीबांसाठी अंत्योदय योजना, पंतप्रधान आवास योजना, विमा योजना अशा योजनांचा अनेकांना फायदा झाला आहे. या योजना कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. पक्षात काम करतांना आपले व्यक्तीमत्व प्रभावी असले पाहिजे. भाजपमध्ये प्रमाणिकपणे काम केल्यास त्याची दखल घेतलीच जाते, त्यानुसार संधीही उपलब्ध होत असते.

     याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, अ‍ॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, मधुसूदन मुळे आदिंनी भाजपा पक्षाची स्थापना, इतिहास, राष्ट्रीय नेत्यांनी दिलेले योगदान, पक्षाची विचारधारा, योजना, सुरु असलेले कार्य या विषयावर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमास उपाध्यक्ष सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी, जगन्नाथ निंबाळकर, संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, अमोल निस्ताने, मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, सतीश शिंदे, वसंत राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, बाबा सानप, राम वडागळे, बाळासाहेब गायकवाड, प्रदेश महिला सचिव सुरेखा विद्ये, नगरसेवक रविंद्र बारस्कर, शुभांगी साठे, सतीश शिंदे, गिता गिल्डा, रविंद्र बाकलीवाल, अनिल सबलोक, संगीता खरमाळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड.विवेक नाईक यांनी केले तर महेश नामदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  तुषार पोटे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागेबाबा संस्थेच्या उपक्रमाने ‘माउली’ च्या महिलांना अस्तित्वाची जाणीव

 डॉ.राजेंद्र धामणे : मानगाव प्रकल्पातील भगिनींच्या हस्ते २०२१ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

वेब टीम नगर :  सामाजीक जाणीवेतून व विचारधना वर काम करणाऱ्या नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ‘मानगाव’ प्रकल्पामधील भगिनींच्या हस्ते होणे ही बाब आमच्यासाठी सर्वात आनंदायी आहे. आत्तापर्यत दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या या महिलांना नागेबाबा संस्थेने मोठा बहुमान दिला आहे. आपल्या जीवनालाही काही अर्थ, अस्तित्व आहे याची जाणीव आमच्या भगिनींना दिलेला आत्मसन्मान व मानाने झाली आहे, असे प्रतिपादन माउली प्रकल्पाचे प्रमुख डॉ.राजेंद्र धामणे यांनी केले.

          श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रडीट सोसायटीच्या वतीने मानगाव प्रकल्पातील महिला भगिनींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या हस्ते संस्थेच्या २०२१ नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माउली प्रकल्पाचे प्रमुख डॉ.राजेंद्र धामणे, डॉ.सुचेता धामणे व सचिन धामणे यांचा सन्मान नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डिझायनर आर्टीस्ट ज्ञानेश शिंदे होते. यावेळी नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष  कडूभाऊ काळे, नागेबाबा परिवाराचे सदस्य अजित रसाळ, प्रा.सविता नवले, गणेश कासार, व्यवस्थापक सीए. अमित फिरोदिया आदींसह प्रकल्पातील महिला उपस्थित होते.

          यावेळी डॉ.धामणे पुढे म्हणाले, आपली समाज रचना जोवर बदलत नाही तोवर अशा मनोरुग्ण, अत्याचारास बळी पडलेल्या महिलांची सांख्य वाढणारच आहे. आपण किती दिवस शांत बसून केवळ बघ्याची भूमिका घेणार आहोत. माणूस म्हणून आपले काही कर्त्यव्य आहे कि नाही ? असा सवाल करत डॉ. धामणे यांनी फक्त समाज व्यवस्था बदलणे हेच आमचे ध्येय आहे, यासाठी नागेबाबा सारख्या सामाजिक संस्था आमच्या बरोबर आहेत. असे सांगितले.

          यावेळी अध्यक्ष कडूभाऊ काळे म्हणाले, ज्यांना स्वतःचे आई बाबा सांभाळत नाहीत अशा शेकडो महिलांचे डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे हे आई बाबा झाले आहेत. धामणे दाम्पत्याच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्वांनी आपले काम सामाजिक जानोवेतून करावे. दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या प्रकल्पाचे महान कार्य पाहून संपूर्ण नागेबाबा परिवार भावूक झाला आहे.

          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीए. अमित फिरोदिया यांनी नागेबाबा संस्थेची सविस्तर माहिती देवून संस्थेच्या१२ व्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले आहे. सर्वांना प्रेरणा मिळेल अशा व्याक्यांच्या विचारधनाचा समावेश दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर करण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी डॉ. मोनिका, नागेबाबा परिवाराचे सुनील दगडे, किशोर नवले, सुभाष चौधरी, सुनील गव्हाणे, मीरा नवले, बापूसाहेब नवले, सागर पंडित,  मेहेत्रे, तुपे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन संजय मनवेलीकर व भरत दारुंटे यांनी केले तर आभार राजेंद्र चिंधे यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 श्री विशाल गणेश मंदिराची किर्ती राज्यभर होत आहे 

प्रा.माणिकराव विधाते : विधाते परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास ५१ हजारांची देणगी

    वेब टीम  नगर : श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे ग्रामदैवत आहे, त्यामुळे या श्रीगणेशावर अनेकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा श्रीविशाल म्हणून ख्याती आहे. आमच्या परिवाराचीही मोठी श्रद्धा श्री विशाल गणेशावर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार काम उत्कृष्टपणे झाल्याने मंदिराच्या लौकिकात मोठी भर पडलेली आहे. या मंदिराची किर्ती राज्यभर होत आहे. मंदिराच्या कार्यात आपलेही योगदान असावे, या उद्देशाने आपण देणगी दिली आहे. श्री विशाल गणेश हा विघ्नहर्ता असल्याने लवकरच तो कोरोनाचे संकट दूर करेल व सर्वत्र सुख-शांती नांदेल, अशा सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी व्यक्त केल्या.

     राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांचे चिरंजीव सीए अभिजित विधाते व नात निधी चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानास 51 हजारांचे देणगी देण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे, पांडूरंग नन्नवरे, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, अमित खामकर, संतोष मेहेत्रे, वसुंधरा विधाते, डॉ.प्रियंका विधाते-चौरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. शासनाच्या निर्णयानुसार आता मंदिरे उघडली आहेत. भाविक नित्यनियमाने दर्शनासाठी येत आहेत. देवस्थानच्यावतीने भाविकांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टींची विशेष काळजी घेण्यात येत आहे. आज भाविक प्रा.माणिकराव विधाते परिवाराने देवस्थानला देणगी देऊन मंदिर कार्यास हातभार लावला आहे, याबद्दल त्यांचे आभार मानून देवस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम नियोजनानुसार सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.

     यावेळी अशोकराव कानडे यांनी विधाते परिवारातील सदस्यांचा यथोचित सत्कार केला. सूत्रसंचालन  पंडितराव खरपुडे यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घरगुती पिठाच्या गिरणीमुळे उपजिविकेचे साधन झाले


 सीमा त्र्यंबके : द्वारकामाई साई मंदिरात ५० टक्के सवलतीत पिठ गिरणीचे वाटप

    वेब टीम  नगर - कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली, यामुळे अनेक कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद पडले. बेरोजगारांमध्ये आणखी भर पडली, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी ५० टक्के सवलतीमध्ये उपलब्ध केलेल्या पिठ गिरण्यांमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले, असे प्रतिपादन सीमा सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     नगर शहराचे आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन बेरोजगार महिला व तरुणांना उद्योग व्यवसायात आणून रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे ५०टक्के सवलतींमध्ये घरगुती पिठाची गिरणी वाटपाचा शुभारंभ केला. वसंत टेकडी येथे साई मंदिरामध्ये गरजू महिलांना सीमा त्र्यंबके यांच्या हस्ते ५७ पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.त्र्यंबके बोलत होत्या.

     याप्रसंगी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अध्यक्ष योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, महेश टाक, दिपक कुडिया, स्वाती पवळे, प्रतिक्षा राऊत, आशा कलंके, वनिता बिडवे आदि उपस्थित होते.

त्र्यंबके पुढे म्हणाल्या, घरगुती पिठ गिरणीमुळे महिलांना कुठेही बाहेर न पडता घरामध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भामुळे घराजवळच दळण मिळू लागल्याने इतर महिलांना घराजवळच दळणाची सोय होणार आहे, असे सांगून महिलांच्या पाठीशी खंबरपणे उभे राहू असे सांगितले.

 याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या या उपक्रमास नगर शहरासह उपनगरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा लाभ महिलांसह बेरोजगार तरुण देखील घेत असल्याचे सांगितले.

 याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणाले की, ५० टक्के सवलतीच्या दरातील पिठाच्या गिरण्या या उपक्रमाला आमच्या परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे महिलांना वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे सांगितले.

     या उपक्रमाचे बबलू सूर्यवंशी, दिपक कुडिया यांनी स्वागत केले शेवटी प्रतिक्षा राऊत यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लाड सुवर्णकार श्री विठ्ठल मंदिरात त्रिपुरारी दिपोत्सव

    वेब टीम  नगर  - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे लाड सुवर्णकार समाजाच्या कोर्टगल्ली येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हरिओम भजनी मंडळाने केलेल्या दिपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला. दररोज पहाटेच्या काकड आरतीपासून दिवभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गाभार्‍यातील श्री विठ्ठल-रुख्मिणी, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या श्री मूर्तीला आकर्षक लोण्याचा पोषाख करण्यात आला. आकर्षक व भव्य रांगोळी व सभोतली दिव्यांची सजावट यामुळे मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.

     यावेळी सुनिता कुलट, छाया लखारा, संगीता बेरड, मंगल डागवाले, सिंधूबाई सुडके, शालिनी राठोड, सुमन मोकाटे, श्रीमती शहरकर, वंदना शहरकर, मिनाक्षी उदमले, स्नेहा राठोर यांनी या त्रिपुरारी उत्सवात सक्रिय सहभाग घेतला.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाड सुवर्णकार समाज अध्यक्ष संजय देवळालीकर, विश्‍वस्त मुकुंद निफाडकर, प्रकाश देवळालीकर आदिंचा सहयोग लाभला. याप्रसंगी असंख्य भाविकांनी उत्सवास भेट देऊन दर्शन घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘योग विद्या धाम’ चे नियमित योग वर्ग सुरू


    वेब टीम  नगरः  लॉकडाऊन चे नियम शिथील झाल्यामुळे व शासनाने योग वर्ग घेण्यात परवानगी दिल्यामुळे येथील योग विद्या धाम चे योग प्रवेश, योग संजीवन, ओंकार व इतर वर्ग दि. 30 नोव्हेंबर पासून नगर शहरातील विविध भागात नियमित सुरू झाले आहेत, अशी माहिती योग विद्या धामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली.

     योग वर्ग दररोज सकाळी भिस्तबाग रोड व सिध्दबाग येथील योग भवन येथे होणार आहेत. या योग वर्गाचा लाभ घेण्या करिता व माहीती साठी   कार्याध्यक्ष जयंत वेसीकर  मो.7387442288  यांचेशी संपंर्क साधावा, असे आवाहन योग विद्या धामच्यावतीने करण्यात आले. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कोरोना लसीत’ योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

    वेब टीम  नगर : अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.उमेश शालीग्राम हे सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना लस बनवत असलेल्या सिरम इन्स्टिट्युटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन पाहणी करुन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. यावेळी सिरम इन्स्टिट्युटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ.उमेश शालीग्राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसी बाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.उमेश शालीग्राम यांचे कौतुक केले.

     डॉ.उमेश शालीग्राम हे अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच त्यांनी काही काळ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केलेली आहे. डॉ. उमेश शालीग्राम यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे अनेकांनी अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.एन.आर.सोमवंशी, डॉ.ए.व्ही.नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ.बी.एम.गायकर, ए.वाय.बळीद आदि उपस्थित होते. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अभय शालीग्राम यांचे ते थोरले बंधू आहेत.

     यावेळी डॉ.बार्नबस म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.उमेश शालीग्राम आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महत्वाच्या लसीकरणाच्या उत्पादनात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचा अभिमान आहे. महाविद्यालयाच्यावतीने देण्यात येत असलेल्या दर्जेदार  शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करुन देशाच्या विकासात योगदान देत आहे, याचा महाविद्यालयाला अभिमान आहे. डॉ. उमेश शालीग्राम व त्यांच्या टीमला यश मिळून लवकरच कोरोना निर्मुलनाचे काम होईल, असा विश्‍वास डॉ.बार्नबस यांनी व्यक्त केला.

     लवकरच महाविद्यालयाच्यावतीने डॉ.उमेश शालीग्राम यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करतात

महेश घोडके : ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता , मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी धनादेश स्विकारुन जागेची नोंदणी सुरु

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने वंचितांची प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान करण्यात आला. तर इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या प्रकल्पाचे धनादेश स्विकारुन जागेची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात मकरंद घोडके यांचा लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके यांच्या हस्ते तर ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यांना त्यांच्या घरी सुभाष मुथा यांच्या हस्ते मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, प्रकाश भंडारे, वसंत लोढा, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, सोमनाथ अडाग़ळे, पोपट भोसले, नामदेव अडागळे, सखुबाई बोरगे, शशीकला पेद्राम, किशोर मुळे आदिंसह घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके म्हणाले की, पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करीत असतात. सत्य समोर आनण्याचे धाडसी काम आजपर्यंत पत्रकारांनी केले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबध्द आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांनी वंचितांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले असून, त्यांना दिलेला सन्मान योग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वसंत लोढा यांनी घरकुल वंचितांना घरे मिळवून देण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांनी समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य सुरु केलेले असून, वंचितांच्या पाठिशी नेहमीच उभे राहणार असल्याचे सांगितले. तर घरकुल वंचितांचा प्रश्‍न सहा वर्षाच्या संघर्षानंतर एकजुटीने पुर्णत्वास जाणार असल्याची भावना व्यक्त केली.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, लोकशाहीचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी माध्यमांवर आहे. कॉन्टम फिजिक्स मधील ऑब्जर्वर्स इफेक्ट या तंत्राप्रमाणे देशातील लोकशाहीमध्ये चेक अ‍ॅण्ड बॅलन्सचे काम पत्रकार करीत असतात. वंचितांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार्‍या पत्रकारांचा सन्मान होणे अत्यावश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार घटकामुळे समाज सावरला असल्याचे सांगितले.

 घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात १गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होत आहे. सदर प्रकल्पात २३१ घरे उभारण्यासाठी प्रत्येकी एक गुठ्याचे प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जागा घेऊ इच्छिणार्‍या घरकुल वंचितांचे धनादेश या रविवार पासून स्विकारुन त्यांच्या जागेची नोंद सुरु करण्यात आली आहे. घरकुल वंचितांनी धनादेश देऊन जागेची नोंद करुन घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु 

आ. संग्राम जगताप : साईराजनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण 

वेब टीम नगर : शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु आहे. उपनगरांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात असून, बोल्हेगाव उपनगर अत्यंत झपाट्याने विकसीत झाला आहे. प्रभाग ७ मध्ये नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्याने अनेक विकासकामे मार्गी लागून एक मॉडेल प्रभाग म्हणून पुढे आला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

 बोल्हेगाव उपनगरातील प्रभाग क्र.७ मधील साईराजनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक तथा माजी सभागृहनेते कुमार वाकळे, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक अ‍ॅड. राजेंद्र कातोरे, नगरसेवक सागर बोरुडे, मदन दिवटे, उत्तमराव अडसूळ, कल्पना गुंजाळ, संजय राऊत, आदिनाथ म्हस्के, देवेंद्र गवस, अनिता सोनवणे, वैभव शेवाळे, रमेश वाकळे, सनी वाकळे, शरद महापुरे, निवृत्ती उंडे, संजय कडूस, मोहन पडोळे, समाधान मोरे, विकी बोरा, भाऊसाहेब काळे, मुन्ना शेख, गोरख खाडे, अशोक गवांदे, संदीप गहिले, रामा काते, कांतीलाल जगताप, सुनील भालेराव, रवींद्र साठे, मोहन पडोळे, शेषराव बडे, शरद ढमाले, विशाल पवार, शुभम शिर्के, शरद देवरे, रवींद्र खेडकर, अविनाश काळे आदिंसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

पुढे आ.  जगताप म्हणाले की, प्रभाग७ मध्ये मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात आल्याने नागरिक देखील समाधानी आहेत. जेथे विकासात्मक कामे होतात त्या प्रभागाचा झपाट्याने कायापालट होऊन नागरी वस्ती वाढत असते. वाकळे यांनी स्वत: लक्ष देऊन प्रभागातील सर्वच प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात राहिलेले काही प्रश्‍न देखील लवरकरच सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.  

नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले की, खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. प्रभाग 7 मध्ये विकास कामे करण्यासाठी आपण सदैव कटिबध्द राहिलो असून, प्रभागाचा विकासात्मक कायापालट झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात सर्वाधिक निधी प्रभाग 7 मध्ये खर्च करण्यात आलेला आहे. नगरसेवक कितीही पाठपुरावा करणारा असला तरी निधी देणारा विकासात्मक दृष्टीचा असला पाहिजे. संग्राम जगताप यांनी विकासात्मक दृष्टी ठेऊन प्रभाग 7 बरोबरच बोल्हेगाव उपनगराचा मोठ्या छपाट्याने विकास होण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

साईराजनगर परिसरातील मोहोळकर घर ते उत्तमराव अडसूळ घर ते कल्पना गुंजाळ घर ते भाऊसाहेब काळे यांच्या घरा पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचा प्रलंबीत प्रश्‍न सोडविल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमार वाकळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हुकुमशाही राजवटीप्रमाणे भाजप सरकार वागत आहे 

कॉ.सुभाष लांडे : किसान सभेच्या वतीने दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा

वेब टीम नगर: शेतकरीविरोधी असलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारचा जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.

प्रारंभी महिला शेतकरी चित्रा उगले व रोहिणी घिगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपप्रणित मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात कॉ. सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, आप्पासाहेब वाबळे, संतोष खोडदे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, सुनिल ठाकरे, विकास गेरंगे, अरुण थिटे, भारत अरगडे आदिंसह शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हुकुमशाही राजवटीप्रमाणे भाजप सरकार वागत आहे. या काद्याला विरोध दर्शविणार्‍या शेतकर्‍यांवर लाठी हल्ला, अश्रूधुर व पाण्याचे फवारे मारुन अनेक शेतकर्‍यांना जखमी करण्यात आले. तर एक शेतकरी या चळवळीत शहिद झाला. केंद्र सरकारची ही दडपशाही संतापजनक असून, सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप कॉ. सुभाष लांडे व बन्सी सातपुते यांनी केला. यावेळी आंदोलकांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments