अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने रग्णवाहिकेचे लोकार्पण

 हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जन्मदिवस ईद-मिलादुन्नबी निमित्त

अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन 

च्यावतीने रग्णवाहिकेचे लोकार्पण


     वेब टीम नगर - हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. त्याच सेवा भावनेतून आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करुन खरी मानवसेवा जोपासली आहे. शहरातील नावाजलेली समाजोपयोगी संस्था ‘अहमदनगर सोशल फाऊंडेशन’ ने शहरातील गरजूंसाठी अल्पदरात या रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या रुग्णांवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने सेवा मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल पोखर्णा यांनी व्यक्त केले.

      अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने रग्णवाहिकेच्या लोकार्पण याप्रसंगी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल पोखर्णा, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूर शेख, अहमदनगर सोशल फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष नईम सरदार, इंजि.इम्रान हाजी अन्वर खान, कासमभाई केबलवाला, पै.हमजा चुडीवाला, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुलेखान, रुग्णमित्र नादिर खान, मुबीन शेख, मुस्कान असोसिएशचे अध्यक्ष शफाकत सय्यद, सरफराज सुलतान, राजमोहम्मद नुरी, वाहिद बब्बुभाई आदी उपस्थित होते.

         प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूर शेख म्हणाले, अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन कित्येक वर्षांपासून समाज कार्यात अग्रेसर असुन नित्य नियमाने अविरतपणे कार्य करीत आहे. मोफत पाणी वाटप, मोफत अन्नदान, गरजवंताना - अनाथांना कपडे-स्वेटर-घरगुती उपयोगाच्या वस्तू, झाडे लावणे, मोफत पाठ्यपुस्तके वाटप, रक्तदान, व्यसनमुक्ती कार्यक्रम, महिलांना सिलाई मशीन शिकवणे, जातीय सलोखा - राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे विविध उपक्रम राबविणे असे एक नाही अनेक सामाजिक प्रश्‍नावर उत्तर देण्याचे काम संघटना व संघटनाचे प्रमुख नईम सरदार व संस्था चे पदाधिकारी करीत आहेत. त्यांचे कार्य मी नेहमी पहात असुन समाजोपयोगी गरजु-गरजवंताना नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावलेली आहे. आता अ‍ॅब्युलन्समुळे त्यांच्या सामाजिक कार्यात आणखी भर पडणार आहे.

     यावेळी अध्यक्ष नईम सरदार म्हणाले, लॉक डाऊन काळात कोरोना व्हायरस मुळे अनेक गरजु गरजवंताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याचे निरासरण करणे साठी अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने अल्पदरात रुग्णवाहिका - अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देण्यात येणार असुन प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील शहर व परिसरात ही सेवा देणार असुन गरजुंनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन केल.

      आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्याचे अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.इम्रान हाजी अन्वर खान यांनी केले तर आभार अध्यक्ष कासमभाई केबलवाले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments