श्री सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या युवकांनी रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

श्री सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या  युवकांनी

 रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी                                  

वेब टीम नगर-रक्तदान सर्वष्रेष्ठ दान आहे.रक्तदानामुळे जीवदान मिळते.सध्या कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे.या काळात मंडळाने सामाजिक भान ठेवून रक्तदानाचा उपक्रम राबविला आहे.दरवर्षी मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.श्री सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

  जुनाबाजार रोड येथील श्री सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे मठ मंदिर संपर्क प्रमुख हरिभाऊ डोळसे,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद डोळसे,गणेश फाटक,संग्राम निकम,सागर डोमे,नितीन वर्मा,राहुल काळे,आदित्य फाटक,अनिकेत ताठे,सागर शिंदे,अनिकेत खाडे ,धीरज सारासार,सुमित वर्मा,चेतन डोळसे,गणेश औटी,रुपेश माताडे,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.गुलशन गुप्ता, सागर उंडे,सौ.मीरा डोळसे,मनीषा फाटक,ज्योती खाडे,अर्चना डोळसे,नीता फाटक,वर्षा डोळसे,रंजनी डोमे,सुनीता माताडे, वंदना निकम,सरला शिंदे आदी उपस्थित होते.                                                 रक्तदानाच्या सुरुवातीला देवीची महाआरती करण्यात आली.महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.या रक्तदान शिबिरात महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.                                                                                   



Post a Comment

0 Comments