आरोग्य आहार

आरोग्य आहार 

राजगिरा खीर

साहित्य: राजगिरा एक वाटी, खोबरे बारीक केलेले एक वाटी किंवा ओल्या नारळाचा चव, गुळ, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे आणि दूध

कृती: प्रथम एक वाटी राजगिरा स्वच्छ धुऊन कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घ्यावा.शिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून त्यामध्ये गूळ, शेंगदाणे, ओल्या नारळाचा चव, वेलची पावडर घालून एक उकळी येऊ द्यावी. व्यवस्थित हलवून घेऊन त्यामध्ये एक ते दीड वाटी दूध घालून परत एक उकळी येऊ द्यावी. वाढताना काजू बदाम पिस्ते घालून वाढावी.

पोषणमूल्ये: राजगीर यामधील कॅल्शियम , लोह, फायबर मिळते. त्याच प्रमाणे पचनाला खूप हलके असते. गुळा मधील लोह पण मिळते. त्यामुळे उपवासासाठी एक उत्तम स्वीट डिश ठरते.

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 



Post a Comment

0 Comments