बंगालच्या उपसागरात सोमवारी नव्या वादळाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात सोमवारी नव्या वादळाचा अंदाज 

राज्यात परतीच्या पावसा  ऐवजी अतिवृष्टीचा धोका  वेब टीम पुणे: बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या आठवड्यात परतीचा पावसा ऐवजी अतिवृष्टीचा धोका  निर्माण  होण्याची     शक्यता निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात एका समुद्रातून दुसरा समुद्रात प्रवास करणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचीही अति दुर्मिळ घटना देशातील हवामान शास्त्राने पहिल्यांदाच अनुभवले येत्या सोमवारी दिनांक 19 रोजी पुन्हा बंगालच्या उपसागरात तशाच प्रकारचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात नवे संकट निर्माण  झाले आहे

परतीच्या पावसाऐवजी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले.  सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे मात्र या पट्ट्याची तीव्रता किंवा त्याच्या वादळाची निर्मिती होणे आणि प्रवासाचा वेग दिशा यावरच त्यांच्या राज्यात वरील परिणाम ठरणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे

महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात कडे सरकला त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे दक्षिण गुजरातमधील हा पट्टा 48 तासात ओमान कडे सरकणारे त्यामुळे त्याची आता चिंता नसले तरी नव्याने निर्माण होणाऱ्या पट्ट्याकडे लक्ष केंद्रित झाले आहे या पट्ट्यामुळे 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आन्धप्रदेश किनारपट्टी आणि तेलंगणा मध्ये मुसळधार तर 20 ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने विभागाने दिला आहे या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रातील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे देशांमध्ये मोसमी पावसाने 28 सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी त्याचा मुक्काम मात्र वाढलेला आहे गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास दहा दिवस होऊन अधिक काळ स्थिर आहे नियोजित आणि अंदाजित वेळेनुसार राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र अद्यापही त्याचा राज्यातील परतीचा प्रवास सुरू झालेला नाही बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे क्षेत्र 19 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर सरकेल सध्याच्या अंदाजानुसार ते खूप मोठा प्रवास करणार नाही पण कमी दाबाचा पट्टा चे रूपांतर चक्रीवादळ झाल्यास त्याचा परिणाम राज्यातील काही भागात होऊ शकेल गेल्यावेळच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मोठा पाऊस पडल्याने त्याबाबत चिंता व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments