रात्रीच्या वेळी घरात घुसून लूटमार करणारी टोळी जेरबंद.

रात्रीच्या वेळी घरात घुसून लूटमार करणारी टोळी जेरबंद.


 स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

 वेब टीम श्रीगोंदे - रात्रीचे वेळी घरात घुसून लूटमार करणारे आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून दिनांक 14 रोजी रात्रीचे वेळी श्रीमती कांताबाई बबन घोडेकर वय 70 वर्ष राहणार घोडेकर वस्ती बेलवंडी तालुका श्रीगोंदा या घरांमध्ये एकट्या झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करून फिर्यादीस मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलीप पवार यांना गुन्हा उघडकीस आणण्या बाबत सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, विजय कोठेकर ,दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संदीप पवार, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे ,प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, रोहित मिसाळ, रोहिदास नवगिरे, सागर मुलानी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांचे स्वतंत्र पथक नेमून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली ती सदरचा गुन्हा किरण भोसले राहणार येळपणे तालुका श्रीगोंदा त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची. आरोपीच्या वास्तव्या  बाबत गोपनीय माहिती काढून सापळा लावून आरोपी किरण निरवश्या भोसले वय 50 वर्षे राहणार तालुका श्रीगोंदा ह्याला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेऊन याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याची मुले नाना केशव भोसले  व साथीदार शंभू चव्हाण यांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने माहितीच्या आधारे  त्यांच्या शिवारात शोध घेऊन आरोपी केशव किरण भोसले वय  21 राहणार यळपणे तालुका श्रीगोंदा ,लखन किरण भोसले वय 18 वर्षे  त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन चोरलेला मुद्देमाल शंभू कुंजा चव्हाण राहणार सुरेगाव याचे कडे असल्याचे सांगितले . आरोपीचा  सुरेगाव परिसरामध्ये शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील कारवाई बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी केशव किरण भोसले यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये दोन गुन्हे दाखल असून आरोपी लखन किरण भोसले त्याचे विरुद्ध सांगवी येथे एक गुन्हा दाखल आहे तर किरण निरवश्या भोसले यांचे विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments