१० लाख ९० हजार रुपयांचे बेकायदेशीर स्फोटकं जप्त

 १० लाख ९० हजार रुपयांचे बेकायदेशीर स्फोटकं जप्त


विशेष पोलीस पथकाची कारवाई

 वेब टीम नगर- फटाके खरेदी करून गोडाऊन नसताना ते विनापरवाना बापू एकनाथ आमले राहणार अरणगाव शिवार शेती गट नंबर १९५ यांच्या जागेत साठवणुकीसाठी ठेवल्याने फटाक्याचे  मालक दत्तात्रय गोरखनाथ वाबळे राहणार पाईपलाईन रोड प्रियदर्शनी हॉटेल जवळ अहमदनगर व जागामालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  दि. १६ रोजी विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्या टीमने ही कारवाई केली.

एकनाथ आमले यांच्या घरात परवाना व गोडाऊन नसताना फटाके तेही कोणत्याही प्रकारची बिले अगर पावत्या नसताना साठा केलेले मिळून आले.

हि  खबर मिळताच  प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक एस.एच.सूर्यवंशी व त्यांचे पथकातील कर्मचारी तसेच इतर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व भिंगार दिवे यांनी मिळून सदर ठिकाणी छापा घातला या घरांमध्ये खाक्या रंगाची स्फोटके असलेले एकूण १०९ बॉक्स त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Post a Comment

0 Comments