जिल्हा वाचनालयाच्या वेळेत बदल

 

जिल्हा वाचनालयाच्या वेळेत बदल

सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचनालय सुरु राहणार

  वेब टीम  नगर - शासकीय आदेशानुसार अहमदनगर जिल्हा वाचनालय सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचकांसाठी खुले राहील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.

     सात महिन्यानंतर काल दि.15 वाचन प्रेरणा दिनी राज्यातील ग्रंथालये सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र ग्रंथालय संचालनालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ग्रंथालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 अशी करण्यात आली आहे. रविवारी वाचनालय बंद राहील. पुढील शासकीय आदेश येईपर्यंत ही वेळ राहील अशी माहिती उपाध्यक्षा शिल्पा रसाळ व अजित रेखी यांनी दिली.

     वाचकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments