अहमदनगर शहरात गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा,

 अहमदनगर शहरात गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा,

१४ लाखांचा  गुटखा  जप्त , एक जण अटकेत

वेब टीम नगर- अहमदनगर शहरातील शेरकर गल्ली येथे बंदी असलेला गुटका बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या घरावर छापा टाकून  १३,९२,७२९ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने केली आहे. या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शेरकर गल्ली येथे शुभम रमणलाल बळगट  यांचे राहते घरी विनापरवाना बेकायदा गुटखा विक्री होत आहे अशी बातमी मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांनीही खबर प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांचे कानी घातली पोलीस उपनिरीक्षक  सूर्यवंशी व त्यांच्या पथकातील कर्मचारी तसेच इतर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी त्या ठिकाणी छापा घातला माहितीनुसार शुभम रमणलाल भळगट (वय २४ वर्षे) राहणार शेरकर गल्ली हा राहते घरी व दुपारनंतर त्याला विश्वासात घेऊन त्याचे गोडाऊन तपासले असता गोडाउन मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा  विनापरवाना बाळगताना आढळून आला या साठ्यामध्ये हिरा पान मसाला ,सुगंधी तंबाखू, गोवा १०००, अशा प्रतिबंधीत वस्तूंची ७००५ लहान-मोठी पाकिटे किंमत रुपये १३,९२,७२९ हिरा पान मसाला, ७१७ सुगंधी तंबाखू ,तंबाखू विना लेबल प्लास्टिक ते अर्धा किलो सीलबंद पॉकेट विमल पान मसाला, तुळशी जाफरानी जरदा, रजनीगंधा पान मसाला, सुप्रीम पान पराग, नजर गुटका, बाबा १६०, आर. एम. डी पान मसाला, सेंटेड तंबाखू, व्ही वन तंबाखू, राजश्री पान मसाला,आदी साहित्य अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात खबर दिली असून भळगट यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी व पथकातील कर्मचारी आणि इतर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी केली आहे.Post a Comment

0 Comments