बाजारपेठ सकाळी 9 ते रात्री 9 खुली राहणार

बाजारपेठ सकाळी 9 ते रात्री 9 खुली राहणार


वेब टीम नगर- नगर शहरातील व जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून त्याची अंमलबजावणीही ही गुरुवारपासून सुरू झाली आहे.

कोरोना प्रादुर्भावानंतर ६६ दिवसांनी सुरू झालेली नगरची बाजारपेठ आता टप्प्याटप्प्याने तिच्या वेळा वाढवण्यात येत आहेत.यापूर्वी सर्वप्रथम रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली त्यानंतर सकाळी सात ते दुपारी एक त्यानंतर तीन वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी ही वेळ वाढवून सातपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली मात्र कालपासून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी परवानगी दिली आहे. मात्र शाळा, महाविद्यालय, मंदिर ,प्रार्थना स्थळ, जिम  मात्र ३१ ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे

व्यापारी संघटनांकडूनही जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments