भाजपा राष्ट्रवादीत जुंपली ; काढले एकमेकांचे बाप

 भाजपा राष्ट्रवादीत जुंपली ; काढले एकमेकांचे बाप

वेब टीम बारामती ,मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती न काढलेल्या आदेशावर टीका करताना अजित पवार यांना आम्ही तुमचे बाप आहोत असे सुनावले होते.  पाटील यांनी हे विधान केल्यानंतर राष्ट्रवादीने थेट नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत पाटलांचा दिल्लीतील  बाप काढला आहे. अजित पवारांवर आम्ही तुमचे बाप आहोत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती या वक्तव्यावर  थांबत नाही तोच पुणे जिल्ह्यातील दौंड मध्ये काढलेल्या काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यानही बारामती कृषी उत्पन्न समिती न काढलेल्या देशावर भाषण करताना अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांवर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले  आहे.  चंद्रकांतदादा तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायचे आहे.  महाराष्ट्रात भाजपची आंदोलने चालू आहे त्यांचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे.  कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता देशातल्या लाखो कामगारांवर अन्याय करणारे  असे कामगार विरोधी विधेयक आणले त्याविरोधात आंदोलन करण्याची इच्छा झाली नाही.  भाजपचे  कृषी विषयक आणि कामगार  विधेयक हे मालकधार्जिणे  आहे.  उद्योगपती साठीच्या बाजारपेठ उभी करण्याचा मोठा मोदी सरकारचा निव्वळ डाव आहे अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून गोळा केले जाईल असं जाहीर केलं यांच्या बापाची पेंड आहे का असा चंद्रकांत पाटील यांनी सवाल केला होता.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक वाद आता एक मे फक्त त्यांचा बाप काढण्यापर्यंत पोहोचला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना राष्ट्रवादीने थेट मोदींना लक्ष्य केलं होतं राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला उत्तर देताना आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

चंद्रकांत दादांचाही पलटवार 

चंद्रकांत  दादा तुम्ही दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि  तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती त्यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

ते म्हणाले की दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे . त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये जे विचारांनी स्पष्ट सरळ आणि खरे असतात त्यांचे वैचारिक वारसदार नेहमीच तयार होत असतात, तुमच्या सारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना शह देण्यासाठी अशा शब्दात पाटील यांनी शशिकांत शिंदे व पलटवार केला आहे. Post a Comment

0 Comments