यंदा जिल्ह्यात विक्रमी पाऊस

यंदा जिल्ह्यात विक्रमी पाऊस   


१५ तारखे नंतर केटीबंधारे भरण्यास सुरवात होणार 

वेब टीम नगर - आज पर्यंत म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत ८०५.६ मी.मी म्हणजेच सरासरी १७९.६२ टक्के इतका पाऊस झाला असून हि आकडेवारी गेल्यावर्षीच्या पर्जन्यमानापेक्षा जास्त असून अजून वेध शाळेने १५ ऑक्टॉबर पर्यंत अति वृष्टीचा इशारा दिला असल्याने गेल्या ४२ वर्षातील पर्जन्यमानाची सरासरी मोडीत काढत किती मी.मी. पाऊस पडतो याची आणि नवा  विक्रम स्थापित करतो याचीच प्रतीक्षा आहे. 

कालच वेधशाळेने गोदावरी,प्रवरा,सीना , भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वार्तिविली आहे.काल सायंकाळ नंतर भंडारदरा धरण ,निळवंडे धरण आणि ओझर बंधारा मधून पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याचं जाणवत असलं तरी नांदूर मधमेश्वर गोदावरी नदीत ४,०४ क्युसेक ने तर जायकवाडी धरणातून ९,४३२ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर भीमा नदीत दौंडपूल येथे ३,७४० क्युसेक घोड धरणातून घोड नदीत ३,०० क्युसेक तर मुळा धरणातून ६,०० क्युसेक इतका विसर्ग मुळा नदी पात्रात सोडण्यात आला असून सीना नदी पात्रात सीना धरणातून ३,६४ क्युसेकने विसर्ग चालू आहे. 

यंदा सीना नदीलाही दोनदा पूर आला होता तर ३-४ वेळेस पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती.शिवाय शेवगाव श्रीगोंदा तालुक्यातही पाऊसाने शेतात पाणी साठल्याने पिकांची नासाडी झाली. आता परतीचा पाऊस सुरु झाला आहे एरवी ह्या कालावधीत केटी बंधारे भरून घेण्याची प्रक्रिया सुरु होत असते मात्र यंदा अजूनही या प्रक्रियेला सुरवात झालेली नाही .वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे केटीवेयर्स च्या फळ्याही टाकल्या आलेल्या नाहीत. आता परतीच्या पावसाच्या रागरंग पाहून नदी पात्रातील पाण्याचा अंदाज घेऊन मग केटीवेयर बंधारे भरून घेतले जातील अन्यथा नदीपात्रातील पाणी इतस्ततः पसरण्याची शक्यता आहे. 

नगर शहरातही दरवर्षी साधारणतः ५५० मी.मी. इतका पाऊस पडत असून मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरासरी पेक्षा दुपटी इतका पाऊस नगर शहरातही पडत आहे. गेल्या बेचाळीस वर्षातील सर्वात जास्त आकडे वारी असून अशीच आकडेवारी कमी अधिक फरकाने अशीच आकडेवारी असल्याचे दिसून येते. यंदा झालेल्या विक्रमी पावसात १५ तारखे पर्यंतच्या पावसाची भर पडल्यानंतर पाऊस कोणता नवा विक्रम करणार हेच पाहणे बाकी आहे.
Post a Comment

0 Comments