अतिवृष्टीचा इशारा

अतिवृष्टीचा इशारा 

नागरिकांना सावधानता बाळगण्याची सूचना 

 वेब टीम नगर - भारतीय हवामान खात्याकडून आलेल्या सुचने नुसार दि. ११ ते १५ ऑकटोबर ह्या कालावधीत नगर जिल्ह्यात अति वृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे . आज पर्यंत (जून ते सप्टेंबर) या कालावधीत ८०५.६  मी.मी. म्हणजेच १७९.६२ टक्के सरासरी इतके पर्जन्य झाले आहे. 

दि. १३ रोजी सकाळी १० वाजता नगर जिल्ह्यातून  वाहणाऱ्या   नदीस नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४०४ क्युसेक , जायकवाडी धरणातून ९४३२ क्युसेक , मुळा धरणतुन मुळा नदीत ६०० क्युसेक , सीना धरणातून सीना नदीत ३६४ क्युसेक , भीमा नदीस दौंड पूल येथे ३८८२ क्युसेक व घोडनदीस ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणिखीन पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील निसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा आप्पती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि प्रशासन द्वारा दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नदी , ओढे व नाल्याचा काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच पाणी पातळीत वाढ असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून ओढे नाले या पासून दूर रहावे , सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे , नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये . पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये . जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतींना मध्ये आश्रय  घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते त्या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी , घाट रस्त्यानी प्रवास करणे शक्यतो टाळावे. 

धरण व नदी क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. धोका दायक ठिकाणी चढू वा उतरू नये , धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये . मेघगर्जना होत असल्यास  झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीक चे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा तसेच जिळ नियंत्रण कक्ष ,  जिल्हाधिकारी कार्यालय , येथील टोल फ्री नंबर - १०७७, ०२४१-२३२३८४४ वा ०२४१-२३५६९४० या क्रमांकांवर संपर्क साधावा. 

Post a Comment

0 Comments