आरोग्य आहार

आरोग्य आहार 

नाचणीचे अप्पे 


साहित्य : 

१ वाटी नाचणी , १/२ वाटी उडीद डाळ , १/२ वाटी तांदूळ , १/२ वाटी हरभरा डाळ , १/२ वाटी ओल्या नारळाचा चव , आले,हिरवी मिरची पेस्ट , १ चमचा जिरे , मीठ. 

कृती :

 नाचणी , उडीद डाळ, तांदूळ, हरभरा डाळ , वेगवेगळी भिजत घालावे . ५-६ तासानंतर वेगवेगळे पाणी टाकून रवाळ वाटून घ्यावे . ह्या पिठामध्ये आले लसूण , हिरवी मिरची पेस्ट , जाडसर , वाटलेले जिरे , मीठ , नारळाचा चव , घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या . हे मिश्रण परत ४ ते ५ तास झाकून ठेवा . ४ ते ५ तासांनी हे पीठ फुगून येते. 

अप्पे पात्र गरम करायला ठेवणे. पाच मिनिटांनी त्यामध्ये तेल सोडून अप्पे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. चटणी बरोबर किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावा . 

टीप: 

ह्यामध्ये पदार्थ अजून पौष्टिक करण्यासाठी तुम्ही हिरवे मूग व गव्हाचा कोंडासुद्धा वाढवू शकता. 

नाचणीमुळे  खूप कॅल्शिअम  मिळते व सर्व डाळींमुळे प्रोटीन मिळते आणि म्हणूनच हा पदार्थ खूप पौष्टिक होतो. 


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 

Post a Comment

0 Comments