आरोग्य आहार

 

आरोग्य आहार

मिक्स व्हेज थालीपीठ




साहित्य :

सर्व प्रमाण छोट्या वाटीने घेणे.

वाटी गाजराचा किस, वाटी लाल भोपळा किस, वाटी कद्दू किस, वाटी काकडी किस. प्रत्येकी / वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पालक , मेथी , पाव वाटी बारीक चिरलेला पुदिना.

प्रमाण माध्यम आकाराची वाटी वाटी ज्वारीचे पीठ , वाटी डाळीचे पीठ , / वाटी नाचणी सत्व , / वाटी मक्याचे पीठ, / वाटी तांदळाचे पीठ . मीठ , ओवा , आले- लसूण पेस्ट ,तीळ , हळद, तिखट.

 

कृती:

सर्व पीठे एकत्र करून घेणे. त्यामध्ये सर्व किसलेल्या भाज्या ,बारीक चिरलेल्या पालेभाज्या घालणे. चवीप्रमाणे मीठ , तिखट , ओवा , तीळ, आलेलसूण पेस्ट घालून पीठ चांगले मळून घेणे. लागले तरच पाण्याचा हात लावणे.

छोटे छोटे गोळे घेऊन पुरी च्या आकाराचे थालीपीठ थापणे छान  खरपूस भाजून घेणे . लोण्या बरोबर सर्व्ह करणे.

 

टिप: ह्या मध्ये सिजनल भाज्या वाढवू शकतो. हिवाळ्यामध्ये बाजरीचे पीठ सुद्धा मिक्स करू शकतो यामुळे सर्व भाज्या (आवडत नसलेल्या ) चवीने खाल्ल्या जातात.त्याच बरोबर गाजर भोपळा या मधून व्हिटॅमिन  A मिळते. काकडीमुळे पित्त शमनही होते . सर्व भाज्यांमुळे फायबर सुद्धा मिळते पोटही भरते. नाचणी मधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते . डाळीचे पीठ  प्रोटीन देते.


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 


Post a Comment

0 Comments