ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण

 ट्रान्सपोर्ट  कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण 

शिवाजी कडूस : थकीत  वेतन न मिळल्यास केंद्रीय पातळीवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार

वेब टीम नगर : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोव्हिडच्या काळात त्यांचा जीव धोक्यात घालून काम केले आहे प्रशासन व शासनाकडून पगारांची पूर्तता केली जात नाही वेळोवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केंद्रीय पातळीवर निवेदन दिले असूनही आम्हाला तीन तीन महिने जर पगार मिळत नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांचा संसार चालविणे अवघड होणार आहे एकतर पगार तुटंपुंजा असून तो होत नाही ज्या ज्यावेळेस प्रशासनाला गरज पडली त्यावेळेस या कर्मचाऱ्याला वापरून घेतले आहे त्यामुळे कर्मचाऱ्याचा तीन महिन्याचा पगार झाला पाहिजे अशी रास्त मागणी आहे जर भविष्यात पगार झाला नाही तर पुढचे आंदोलन केंद्रीय पातळीवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे प्रतिपादन विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस यांनी केले.

सर्जेपुरा येथील एस टीच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर माहे जुलै,आगस्ट,सप्टेंबर या तीनही महिन्यांचे थकित वेतन मिळण्याबाबत महाराष्ट्र स्टेट टान्सपोट कामगार संघटना आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, विभागीय सचिव डी.जी.अकोलकर, विभागीय कोषाध्यक्ष यु.एस. रणसिंग, विभागीय कार्याध्यक्ष आर.सी.आडसूळ व विभागीय कार्यकारणीचे सदस्य व सव आगाराचे पदाधिकारी उपस्थित होते.सदरचे निवेदन विभाग नियंत्रक विजय गिते यांना देण्यात आले.

डी जी अकोलकर म्हणाले की, स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्व कर्मचारी कामावर आहेत मात्र गेल्या तीन महिन्यापासून पगार झाला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे कर्मचारी  आता रोजाने कामाला जात आहे अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.आम्ही नोटीस दिल्यानंतर काल एक महिन्याचा पगार महामंडळाने सर्व कर्मचाऱ्यांना खात्यावर जमा केला आहे परंतू उर्वरीत दोन महिन्याचा पगार अदयापपर्यत मिळाला नाही जोपर्यत उर्वरीत दोन महिन्याचा पगार न मिळल्यास  आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आत्मक्लेश आंदोलन करत आहोत.जर मागणी मान्य न झाल्यास या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे राज्य पातळीवर संघटनेने घेतले आहे.

सदरचे आत्मक्लेश उपोषण हे कोरोना आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन करून व शांततामय मार्गाने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments