सहज योग ध्यानाने आंतरिक शक्ती वाढते

सहजयोग ध्यानाने  आंतरिक शक्ती वाढते 


पोपटराव पवार: सहजयोग भित्ती फलकाचे अनावरण 

वेब टीम नगर- परम पूज्य माताजी श्री. निर्मला देवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहज योग परिवाराच्या तर्फे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात , गावात सहजयोग भित्ती फलकाच्या अभियानाचा शुभारंभ समाज सेवक पोपटराव पवार यांच्या हस्ते बाजार हिवरे तालुका जिल्हा अहमदनगर येथे झाला. 

यावेळी जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे ,प्रचार प्रमुख कुंडलिक ढाकणे , गणेश भुजबळ , अंबादास यन्नम , संपतराव पवार , सोमेश थोरात , श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पोपट पवार म्हणाले संत, ऋषीमुनींनी ध्याना बाबतचे महत्व विशद केले आहे. ध्यान केल्याने माणसाला संतुलन प्राप्त होते परंतु आज माणूसच असंतुलित असल्याने निसर्गाचेही संतूलन बिघडले आहे. कोरोना महामारीचा उद्रेक झाला नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे केल्यास कोरोनाचा फैलाव लवकरच आटोक्यात येईल यासाठी प्रत्येकाने ध्यानसाधना करणे गरजेचे आहे. ध्यान धारणेने माणसाची आंतरिक शक्ती वाढते त्यामुळे त्याला कोणत्याही संकटाला तोंड देण्याची ऊर्जा निर्माण होते. यासाठी प्रत्येकाने सहजयोगध्यान साधना करावी असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी सहजयोगा बाबत गावकऱ्यांना माहिती देण्यात आली .   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश थोरात यांनी तर आभार प्रदर्शन संपतराव पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments