भारतात कोरोनाचे बळी लाखापार



भारतात कोरोनाचे बळी लाखापार 

वेब टीम नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत कोरोना ने घेतला  एक लाख 323जणांचा बळी घेतला असून  महात्मा गांधी जयंतीदिनी म्हणजेच २ऑक्टोबर रोजी भारताने १लाख   ३२३ मृत्यूचा आकडा गाठला  आहे .  

अमेरिका आणि ब्राझील च्या नंतर आता भारताचा तिसरा क्रमांक कोरोनाच्या मृत्यूबाबत लागत आहे.  भारतामध्ये एक लाख 323इतक्या मृतांची  संख्या गाठण्यासाठी 204 दिवस इतका कालावधी लागला, तर तर लाखभर मृत्यूचा आकडा गाठण्यासाठी  ब्राझीलला  १५८ तर  अमेरिकेला ८३दिवस इतका कालावधी लागला होता.  

भारतामध्ये 30 जानेवारीला कोरोनाचा  पहिला रुग्ण आढळला तर १२मार्च रोजी पहिला मृत्यू घडला चीनच्या वूहान मधून आलेल्या विद्यार्थ्यांचे निदान कोरोना रुग्ण म्हणून झालेलं होतं तर पहिला मृत्यू १२ मार्चला कर्नाटकातल्या कलाबूरकी मध्ये ७६ वर्षीय वृद्धाचा  झाला होता जो सौदी अरेबियातून परतला होता हा मृत्यू घडेपर्यंत देशात केवळ ७५  कोरोना केसेस समोर आल्या होत्या . 

भारतात कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख ३२३ इतके असून आतापर्यंत ६४ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोना  ची लागण झालेली आहे . कोरोनाचा पहिला मृत्यू झाल्यानंतर पुढील४८  दिवसात १०००मृतांचा आकडा गाठला  गेला तर पुढील ७८ दिवसात ही संख्या दहा पटीने वाढली आणि दहा हजाराच्या  घरात पोहोचली त्यानंतरच्या ३१दिवसांमध्ये ५० हजार जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आणि त्या पुढील ४८ दिवसातच हा आकडा एक लाखापेक्षा अधिक झाला आहे . कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्ये  मध्ये अमेरिका जगात अव्वल क्रमांकावर आहे तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आतापर्यंत तीन कोटी ४६ लाख पेक्षा जास्त केसेस झाल्या त्यापैकी दहा लाख पेक्षा जास्त लोकं अमेरिकन मृत्यू मुखी  पडले आहेत  तेथील मृत्यूचा दर चार टक्के असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आणि आता तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. 


 

Post a Comment

0 Comments